बानाई तर्फे यंदाची शिष्यवृत्ती घोषीत - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बानाई तर्फे यंदाची शिष्यवृत्ती घोषीत

Share This
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील अनेक हुशार होतकरु विद्यार्थी उच्च शिक्षणापासून दुर सारल्या जात असल्याचे विदारक चित्र समाजात दिसून येत आहे. सर्व प्रकारची क्षमता असतानाही केवळ नाजुक आर्थिक परिस्थितीमुळे अनेक घटक पैश्याअभावी आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून अन्य मार्गाकडे वळताना दिसत आहेत.


समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना आधार मिळून अभ्यासक्रम पुर्ण करण्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (BANAE) चंद्रपुर शाखेच्या आणि R.R. Construction, Hyderabad च्या वतीने मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अशा आर्थिक दुर्बल होतकरु विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात येत आहे.

BANAE चंद्रपुर शाखेने या वर्षीची " बानाई निड बेस्ड स्कॉलरशिप " नावाने योजना जाहीर केलेली आहे. सत्र २०२२-२३ साठी चंद्रपुर जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वच वर्गासाठी तथा सर्वच मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. गरजु विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आपला अर्ज आणि पुरक कागदपत्रांची पुर्तता करुन बानाई चंद्रपुर शाखेत व्यक्तिशः अथवा टपाल द्वारे २६ जानेवारी २०२३ पुर्वी पोहचतील अशा पध्दतीने पोहचता करावे.

विहित अर्जाचा नमुना बानाई चंद्रपुर शाखा तसेच अनेक सोशल मिडिया वर उपलब्ध आहेत. सदर अर्जाचा नमुना व्हॉट्सअँप वर देखिल मागविता येईल. डाऊनलोड करून आवश्यक माहिती आणि संबंधित जोडपत्रे सोबत जोडणे आवश्यक असेल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी बानाई कार्यालय, निलगिरी प्लाझा अपार्टमेंट,डॉ. चिद्दरवार यांचे दवाखाण्यासमोर, रामनगर चंद्रपुर येथे प्रत्यक्ष येऊन अथवा 9921528139, 9604411008, 7588549246 या दुरध्वनिक्रमांकावर संपर्क करावा असे BANAE चंद्रपुर शाखेतर्फे सुचविण्यात आलेले आहे


Pages