अहिर म्हणाले : मलाही बदला घ्यायचा आहे! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अहिर म्हणाले : मलाही बदला घ्यायचा आहे!

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजकीय -
सध्या चंद्रपूरचे राजकारण दारू आणि पाण्याच्या वादातून आतून पेटले आहे. ही ठिणगी कधी पेटेल हे सांगणे सध्या कठीण आहे. मात्र सध्या राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 31 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सामान्यतः शांत असणारी व्यक्ती अतिशय आक्रमक भाष्य करताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये अहिर म्हणत आहेत की, 'निकम्मा , जो काही काम करत नाही तो जिंकला आणि मला म्हणतो की तो घरात बसवले की नाही. अहो, तुम्ही जिंकूनही घरी बसला आणि मी पराभूत होऊनही बाहेर फिरतोय. लोकसभा निवडणूक न जिंकण्याची अनेक कारणे आहेत. मला माहित आहे. पण मलाही बदला घ्यायचा आहे. मी सोडणार नाही. मलाही बदला घ्यायचा आहे.

आता या व्हिडीओबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भाषणात न हंसराज अहिर कोणाचे तरी नाव घेऊन ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना आव्हान देताना दिसतात. दुसरीकडे आपले लोकसभेतील पराभवाची कारणे जाणून घेण्याचा दावा करत, आपल्यालाही बदला घ्यायचा आहे, असे आव्हान ते देत आहेत. मी सोडणार नाही. बहुधा ते त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही आता आपण सूड उगवायला हवे असे सांगत आहेत.

हा व्हिडिओ हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनल्यानंतर व भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या लोकसभा प्रवास दौऱ्यावर आल्यानंतर चा आहे असे कळते. त्यामुळे अहिर यांच्या गटात सध्या  "जोश हाय " असून ते आता थेट आव्हान देताना दिसत आहेत, हा व्हिडिओ काँग्रेस आणि भाजपमध्ये चंद्रपूरच्या आगामी राजकारणात भूकंप आणण्याचे संकेत देत आहे.

Pages