आम आदमी पार्टी भद्रावती मध्ये काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आम आदमी पार्टी भद्रावती मध्ये काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

अरविंद जी केजरीवाल यांचे नेतृत्वात दिल्ली व गुजरातच्या निवडणुकीमुळे आम आदमी पार्टी ला देशात आज राष्ट्रीय पार्टीच्या दर्जा मिळाला आहे. अरविंद जी केजरीवाल व दिल्ली मॉडल व पंजाब मॉडेलची चर्चा भारतातच नही तर अख्या जगात होत आहे. दिल्ली मधे अरविंद केजरीवाल जी यांच्या नेतृत्वात झालेले काम व पंजाब मधे झालेले काम हे लोकांना दिसुन येत आहे व त्या कामची चर्चा हे जमिनी स्तरावरही होऊ लागली आहे.

300 यूनिट विज बिल माफ, सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण, सरकारी दवाखान्यात सुधारण्याचे काम व असे अनेक काम बघुन लोकांना हेच प्रश्न निर्मान होत आहे की जर हे कामे दिल्ली व पंजाब मधे शक्य आहे तर महाराष्ट्र मधे का बर नाही ? हेच बघता दि.11/01/2023 रोजी तालुका सचिव सुमीत हस्तक व सुरज भाऊ शहा यांच्या मार्गदर्शनात व आम आदमी पार्टी चे विसापूर(रे)चे सरपंच प्रदीप भाऊ बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदणखेडा येथे काँग्रेस व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्षप्रवेश घेतला.

ज्या मधे शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर व अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

Pages