सेवानिवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असताना एका शिक्षकाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी जवाहर नगर वॉर्डात घडली.
विलास वासाड (५८) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते बल्लारपूर येथील सर्वोदय विद्यालयात कार्यरत होते. राजुरा येथील जवाहर नगर वॉर्डातील रहिवासी विलास वासाड हे कुटुंबासह राहत होते.
रविवारी सकाळी वासाड यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजुरा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी व एक मुलगा आहे.