प्रेयसीला फोन केला म्हणून मित्रावर चाकूहल्ला - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



प्रेयसीला फोन केला म्हणून मित्रावर चाकूहल्ला

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड तालुका प्रतिनिधी -

प्रेयसीला फोन केल्याचा राग अनावर होऊन मित्रानेच मित्रावर चाकू हल्ला केला. या हल्यात एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मिंडाळा येथे मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.


मंगळवारी नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे मंडई व नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक पाहण्यासाठी आरोपीसह चार युवक मिंडाळा येथे एका ओळखीच्या घरी आले. रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी मयूर सुनील दाणी (21, रा. खेडमक्ता, ता. ब्रह्मपुरी) या युवकाने रूपेश सिडाम (19, रा. वासाळा मेंढा, ता. नागभीड) या मित्राला फोन करून भेटण्यास बोलावले.


रूपेश त्याच गावात नाटक बघण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत आला असल्यामुळे त्यांची भेट मिंडाळा येथे झाली. यावेळी आरोपी मयुर दाणी याने आपल्या चार मित्रांना सोबत घेऊन माझ्या प्रेयसीला फोन का केला म्हणून रूपेश व त्याच्या मित्रांवर हल्ला केला. नंतर आरोपी मयुर याने रूपेशला बाजूला नेऊन चाकूने पोटावर व छातीवर दोन वार केले आणि आरोपी निघून गेले. दरम्यान, रूपेशसोबत असलेल्या मित्रांनी ही बाब गावात येऊन सांगितली.


गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत असलेल्या रूपेशला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, रूपेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले. दरम्यान, नागभीड़ पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून भादंविच्या कलम307, सहकलम 3 (2) (5) अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी मयुर याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर इतर आरोपींची चौकशी सुरू आहे.

Pages