खबरकट्टा / चंद्रपूर :
भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरीकांची सुटका कशी करावी. याबाबतचे प्रात्यक्षिक चंद्रपुर येथील आराध्य दैवत माता महाकाली मंदीर परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मा. पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेसी यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले.
आज दिनांक ११/०१/२०२३ चे सकाळी १०:३० वा. चंद्रपुर येथील महाकाली मंदीर परीसरात तिन दहशतवादी अचानक पणे प्रवेश करून दर्शनासाठी आलेल्या भावीकांना शस्त्राचा धाक दाखवुन ओलीस ठेवले आहे. अशी माहिती मंदीर परीसरातुन १०:३५ वा. चे दरम्यान पोलीस कंट्रोलरूम येथे मिळाल्यावर श्री शेखर देशमुख पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर यांनी कंट्रोलरूम येथुन वरिष्ठांशी योग्य समन्वय साधुन सर्व पथके तात्काळ सर्व पथक ज्या मध्ये दहशतवाद विरोधी शाखा, सी-६० कमांडो पथक, आरसीपी पथक, बिडीडीएस पथक, श्वान पथक, नक्षल सेल, सुरक्षा शाखा, पो.स्टे, चंद्रपुर शहर पोलीस पथक, पोलीस वैद्यकीय चमु वाहनासह घटनास्थळी हजर झाले.
मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधू यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री सुधिर नंदनवार हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले. मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेतली व मंदीर परिसरात दहशतवाद्यांना ताब्यात घेणे व ओलीस असलेल्या नागरीकांची सुखरूप सुटका करण्याची कारवाईचे प्रात्यक्षिक पुर्ण करण्यात आले.
प्रात्यक्षिक वेळी मंदीर परिसरात नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेवून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी पोलीस निरीक्षक पो.स्टे. चंद्रपूर शहर श्री सुधाकर अंभोरे, पो. नि. जिवीशा श्री रविंद्र शिंदे, सपोनि श्री मिलींद पारडकर सि-६० / आर. सि. पी., सपोनि श्री सचिन राखुंडे सुरक्षा शाखा, पोउपनि श्री अभिमान सरकार द. वि. शाखा / नक्षल सेल, पोउपनि श्री बिश्वास बि.डि.डि.एस., पोउपनि श्री राहुल पाटील श्वान पथक तसेच पोलीस वैद्यकीय अधिकारी यांचे सह संबंधीत विभागातील पोलीस अंमलदार मोठया संख्येने सहभागी झाले.