देवेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ आप महाराष्ट्र सहप्रभारी इटालिया यांचा दौरा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



देवेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ आप महाराष्ट्र सहप्रभारी इटालिया यांचा दौरा

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

आम आदमी पार्टीचे गुजरातचे पूर्व प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल भाई इटालियाजी व विदर्भ संयोजक प्राध्यापक डॉ. देवेंद्रजी वानखडे यांचे आज भद्रावतीत आगमन झालं. आम आदमी पार्टीचे विदर्भ अध्यक्ष प्राध्यापक डॉ. देवेंद्रजी वानखडे जी हे नागपूर शिक्षक मतदार संघातून आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे. शिक्षणाचा मुद्दा, शिक्षकांचे जुनी पेन्शन चा मुद्दा, शिक्षकांवर होत असलेले अन्यायाचे मुद्दे असे खूप सारे मुद्दे घेऊन डॉ.देवेंद्रजी वानखडे हे शिक्षक मतदार संघाच्या रिंगणात उतरले आहे. 

त्यांच्या प्रचाराकरिता गोपाल भाई इटालिया हे सुद्धा भद्रावतीत आले होते. आम आदमी पार्टी भद्रावतीच्या कार्यकर्त्यांनी गोपाल भाई इटालिया व डॉ. देवेंद्रजी वानखडे यांच बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं गोपाल भाई इटालिया यांनी सर्वांचं आभार व्यक्त केलं व आम आदमी पार्टीच्या कामाकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.
या वेळी तालुकाध्यक्ष सोनल पाटील, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, सुरज भाऊ शहा, प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन भाऊ पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

Pages