खबरकट्टा/ चंद्रपूर - घुग्गुस
एका संशयास्पदरित्या घुग्गुस - वणी मार्गावर जाणाऱ्या कारचा पाठलाग करून झडती घेतल्यावर कार मध्ये तलवार, हॉकी स्टिक व लोखंडी काठ्या आढळल्या, कार मधील मानस सिंग व इर्शाद शेख या दोघांना ताब्यात घेत शस्त्र बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मध्यरात्री केली आहे.
रविवारच्या रात्रो पोलीसांचा गस्त सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार हे स्वतःही गस्तीवर असताना MH 34 AM 8669 क्रमांकाची टोयोटा कंपनीची कार संशयास्पदरीत्या घुगुस या मार्गाने वणीकडे जात असताना पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कारचा पाठलाग केला काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर कारला थांबविण्यात आले कारची झडती घेतली असता कार मध्ये तलवार, हॉकी स्टिक व लोखंडी दंडे आढळून आले त्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनासह मानस सिंग व इर्शाद शेख दोघांनाही ताब्यात घेत शस्त्रबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून,पुढील कार्यवाही सूरू केली आहे.

