खबरकट्टा/ चंद्रपूर:
बल्हारशाह शहरातील दादाभाई नौरोजी वार्ड येथे शफीक किराणा स्टोअरच्या मागे राहणारा अनिक खरबनकर हा बल्लारपूर पब्लिक स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकतो. अनिल हा सकाळी शाळेत जाण्यास निघाला परंतु शाळेत पोहोचला नाही. अनिक शाळेतून घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शाळेत चौकशी केली, मात्र अनिक काल शाळेत गेला नसल्याचे शाळेतून समजले. अनिक शाळेत गेलाच नाही तर कुठे गेला असेल असा प्रश्न निर्माण होतो.
कुटुंबीयांनी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी शोध घेण्यास सुरु केले परंतु तरीसुद्धा अनिल चा शोध लागला नाही तेव्हा कुटुंबीय नगरसेवक स्वामी रायबराम यांच्यासह बल्हारशाह पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हरवलेला हा तरुण अनिल खरबनकर बल्लारपूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकतो. या तरुण विषयक काही बातमी किंव्हा तो दिसून आढळल्यास 9579167926, 9403881653 या क्रमांकावर माहिती द्यावी.अशी विनंती खरबनकर कुटुंबीयांनी केली आहे.
