वाघीण जेरबंद : ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला स्थानांतरित - खबरकट्टा

.com/img/a/

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

.com/img/a/
demo-image

वाघीण जेरबंद : ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला स्थानांतरित

Share This
.com/img/a/
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -

सिंदेवाही येथील शिवनी वनपरिक्षेत्रातील मौजा चारगाव येथील एका 19 वर्षीय युवकाचा वाघाच्या हल्यात मृत्यु झाला. ही घटना 9 जानेवारीला सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली होती.हल्ला करणारा वाघ नसून ती वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्या वाघिणीला कुकडहेटी येथे जेरबंद करण्यात आले. या वाघिणीला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला स्थानांतरित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ताडोबा बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रातील चारगाव येथील श्रीकांत पटवारु श्रीरामे (19) हा दिनांक 6 जानेवारी रोजी आपल्या शेतावर गेला असता तो घरी परत आला नाही, त्याची शोधा शोध घरच्यांनी मित्र मंडळी तसेच नातेवाइकांकडे केली. दरम्यान 8 जानेवारी रोजी याची तक्रार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे नोंदविन्यात आली.

8 जानेवारी रोजी कुकड़हेट्टीच्या शेतशिवारात एका शेळीला वाघाने ठार मारल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही घटना ताजी असतांनाच दिनांक 9 जानेवारीला सकाळी एका युवकाचा मृतदेह त्याच परिसरात (कुकडहेट्टी गट क्र. 864) आढळला.परंतु या घटनेत वनविभागाने कोणत्याही पक्षाच्या समक्ष पंचनामा नकरताच युवकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला व चारगाव येथील पटवारु श्रीरामे यांना फोन द्वारे तुमचा मुलगा वाघाच्या हल्यात ठार झाल्याची माहिती दिली.

20230110_230446

यानंतर चारगाव व कुकडहेटी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी (कुकडहेट्टी गट क्र. 864) एकच गर्दी केली व शिवनी वनविभागावर रोष व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विषयाचे गांभीर्य ओळखून वनविभागाने हल्ला करणाऱ्या वाघाचा शोध घेणे सुरू केले.कुकडहेट्टी येथे वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
Comment Using!!

Pages