खबरकट्टा / राजुरा : चंद्रपूर :
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १९ फेब्रुवारी २०२२ ला शिवजयंती निमित्ताने दत्तक गाव सुब्बई येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले, सोबतच गावात फेरी काढून स्वच्छता जनजागृती, वृक्षारोपण ही करण्यात आले, पर्यावरण संरक्षण, एड्स जनजागृती, कोविड जनजागृती, कोविड लसीकरण, लहान मुलांचे लसीकरण, ग्रीन व्हिलेज, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना, स्त्री पुरुष समानता, ऊर्जा बचत, पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, पाणी अडवा पाणी जिरवा, डिजिटल इंडिया, डिजिटल साक्षरता, कॅशलेस इंडिया, प्लॅस्टिक फ्री इंडिया, साक्षरता अभियान असे विविध उपक्रमाबद्दल घरोघरी जाऊन जाणीवजागृती कार्यक्रम राबविण्यात आले, सोबत मुख्य चौकात ई- वेस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक फ्री इंडिया अशा वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य साजरे करूनजनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला, प्लास्टिक कचरा, बॉटल, प्लास्टिक चे पॉकेट, प्लास्टिक ग्लास उचलून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ५९ स्वयंसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की व डॉ सारिका साबळे यांच्या सोबत स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी तसेच ग्रामीण जनतेत जनजागृती व्हावी यासाठी रासेयो च्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली व पर्यावरण संवर्धनाचा व ग्राम स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. शिक्षकेतर कर्मचारी अनिल बावणे, लता बोबडे उपस्थित होते, यावेळी सुब्बई चे माजी सरपंच मारोती आत्राम, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रदीप बोटपल्ले, विनय जंगलवार माजी पंचायत समिती सदस्य तसेच गावातील नागरिक, युवा उपस्थित होते.