कोरोना चंद्रपूर : 12 नवीन रुग्ण बाधीत #Omicron variant - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कोरोना चंद्रपूर : 12 नवीन रुग्ण बाधीत #Omicron variant

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर ::

चंद्रपूर - गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केली असून त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 12 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे. आरोग्य विभागाक प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 8, बल्लारपूर येथे 2, भद्रावती येथे 1, सिंदेवाही येथे 1 रुग्ण आढळून आले असून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. Lockdown news


जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 913 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 339 झाली आहे. सध्या 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 1 हजार 879 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 11 हजार 626 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1544 बाधितांचे मृत्यू झाले आहे. Coronavirus


प्रशासनाचे आवाहन :

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Omicron


Pages