खबरकट्टा /चंद्रपूर :
सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 11.30
वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ मजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मात्र प्रकरण संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. ज्योती यशवंत बघेले (वय 28) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती बघेले ही सालेकसा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पदावर कार्यरत होती. तिचे लग्न सन 2017 मध्ये पांढरी पाउलदौना येथील रहिवासी रमेश गिरिया याच्याशी झाले होते.
पती रमेश गिरिया सुद्धा सालेकसा पोलीस ठाण्यात सी-60 पथकामध्ये कार्यरत आहे. दोन्ही पती- पत्नी अडीच वर्षाचा मुलगा व आपल्या वडिलासह सालेकसा येथे भाड्याच्या घरात राहत होते.
नेहमीप्रमाणे दोन्ही पती-पत्नी आपापल्या कार्यस्थळी कर्तव्यावर गेले होते. ज्योती सालेकसा पोलीस ठाण्यात कार्य करीत असताना, अचानक ती आपल्या खोलीत निघून गेली.
नंतर माहीत झाले की तिने आपल्या खोलीत गळफास लावला.
घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस घटनास्थळी पोहचले. ज्योतीला फासावरून खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतु
स्थिती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले.