उपविभागीय पोलीस अधीकारी, चंद्रपुर यांची जुगार अड्डयावर धडक कारवाई:#police-raid- - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



उपविभागीय पोलीस अधीकारी, चंद्रपुर यांची जुगार अड्डयावर धडक कारवाई:#police-raid-

Share This

 ३ लाख ३४ हजार ५२६ रुपयाचा मुद्देमाल जप्त

खबरकट्टा /चंद्रपूर :


श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांनी छापा टाकुन १८ जणांना ताब्यात घेतले आहे. १८ आरोपींकडुन ३ लाख ३४ हजार ५२६ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई श्री सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांनी केली आहे. या प्रकरणी १८ जणांविरुध्द दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुर्गापुर हद्दीतील आंबेडकर चौकातील खानदे यांचे दुकानाचे मागील भागातील उत्तरवार यांचे दुकानाचे चाळीमधील दुकानात सट्टापट्टीवर पैसे लाऊन, जुगार खेळत आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांना प्राप्त झाली. त्यावरून सदर ठिकाणी श्री सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपुर यांनी स्टाफसह छापा मारला.

यावेळी सटीपट्टी चालविणाऱ्यासह एकुण १८ इसम जुगार खेळतांना मिळुन आले. सदर इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. १८ इसमांच्या अंगझडतीत रोख रक्कम व इतर साहीत्य असा एकुण ३,३४,५२६ /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारबाई मा. श्री. अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर व मा. श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात श्री. सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर पील पोलीस स्टॉप स.फौ. राजेश चुचूलवार, पो. हेड कॉ. किसन राठोड, पोलीस अमलदार शितल बोरकर, मनोज चालखुरे, पुर्वेश महात्मे, आदेश रामटेके, जगदीश जिवतोडे व अमरदिप आवळे यांचेसह करण्यात आलेली असुन एकुण १८ आरोपींविरुध्द कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायदयाप्रमाणे दुर्गापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

Pages