खबरकट्टा : गडचिरोली :न्यूज डेस्क -
चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांच्या हातून युवकाचा खून झाल्याची घटना गडचिरोली शहरातील आशीर्वाद नगरात, 20 डिसेंबर रोजी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सुबोध जनबंधू (19) रा. आशीर्वादनगर गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुबोधचे आईवडिल रविवारला एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे सुबोध हा घरी एकटाच होता. दरम्यान रात्रीच्या सुमारास सुबोधच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांच्या हालचालीने झोपेत असलेल्या सुबोधला जाग आली. त्याने चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी सुबोधचे हातपाय बांधून त्याचे डोके प्लास्टिकने झाकले व बेदम मारहाण केली. एक लाख 23 हजाराचे दागिने केले लंपास करत चोरट्यांनी त्यानंतर पळ काढला.