स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ने विविध ठिकाणी परफोडी, चोरीचे गुन्हे करणारे अटल गुन्हेगाराचे मुसक्या आवळले:#lcb - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ने विविध ठिकाणी परफोडी, चोरीचे गुन्हे करणारे अटल गुन्हेगाराचे मुसक्या आवळले:#lcb

Share This


एकूण २,०९,८६०/- रु चा माल हस्तगत केला,

खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपुर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या परफोडी, चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता ना. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे उघडीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. ०१/११/२०२१ रोजी बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली चंद्रपुर डिव्हीजन पथक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर फोडी रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना गोपनीय माहितीन्दारे पोस्टे बल्लारशाह परिसरात गोल पुलीया येथे सापळा रचून पो.स्टेबल्लारशाह रेकॉर्ड वरील विसबा गुन्हेगार यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने चार साथीदारासोबत चंद्रपुर येथील गंज वार्ड येथे एक गोदामातून ३२ तेलाचे पिपे, चोरी केल्याचे सांगीतले त्याचेकडुन ११ वेगवेगळ्या कंपनीचे तेलाचे पिपे, गुन्हयात वापरलेली दोन मोटारसायकल दोन मोबाईल असा एकुण १,१४,८६०/-रु चा माल हस्तगत केला आहे.




तसेच पोस्टे रामनगर परिसरात बंगाली कॅम्प येथे काहि दिवसापुर्वी एका इसमाचे गळयातील सोन्याची चैन व मोबाईल चोरी करणारा नेहरू नगर येथील एक आरोपी नामे संभा कुंडलीक पोटे वय २६ वर्ष यास ताब्यात घेवून त्यांचेकडून ७ ग्रॅम सोन्याची चैन व एक मोबाईल असा एकुण ४५,०००/-रु चा माल हस्तगत करण्यात आला.

तसेच पोस्टे दुगीपार जि गोंदिया येथील मोजा सौंदड परिसरात रात्रोला एक घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील एक एच.पी कंपनीचा लॅपटॅप व चांदीचे दागीने चोरी करून चंद्रपुर येथील दुर्गापुर परिसरात लॅपटॅप विकण्यासाठी फिरत असल्याने एका विसवा यास ताब्यात घेवून त्यांचेकडुन एच.पी कंपनीचा लॅपटॅप कि ५०,०००/-रूचा माल हस्तगत करून पोस्टे दुगीपार जि गोंदिया याचे ताब्यात देण्यात आले.

वरील प्रमाणे पोस्टे चंद्रपुर शहर, रामनगर, दुगीपार जि गोंदिया येथे चोरी घरफोडी करणारे ४ विसबा व ३ आरोपी यांचेकडुन एकूण २,०९,८६०/- रू चा माल हस्तगत केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे सा., मा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा. यांचे मार्गदर्शना खाली बाळासाहेब खाडे पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पोठपनी संदीप कापडे पोहवा संजय आतंकुलवार ब.नं. २२१५, पो. शि. नितीन रायपुरे ब.नं. २५४९. पो. शि. गोपाल आवकुलवार, पो.शि. कुदनसिंग बावरी ब.नं. २९४९, पो.शि. प्रांजल झिलपे ब.नं. २९४८, पो.शि. रविंद्र पंधरे ब.नं. १५५८, म.पी. शि. अपर्णा मानकर नं. २८३५ यांनी केली.

Pages