५१ कोटी रुपये नळ योजनेच्या कामावरील मजूराचे नवीन पाणी टाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने मृत्यू
खबरकट्टा /चंद्रपूर :चिमूर :
चंद्रपूर : - दिनांक.१८/१२/२०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान नगर परिषद चिमूर च्या ५१ कोटी रुपये नळ योजनेच्या कामावरील मजूराचे नवीन पाणी टाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल केले असता रुग्णाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले व नागपूर येथील रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्या मजुराचा मृत्यू झाला सहजाद मिया असे मृतक व्यक्तीचे नाव असून वय २७ वर्षे देवापुर बिहार येथील रहिवासी आहे.