खबरकट्टा /चंद्रपूर :सावली :
सावली जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातिल पेंढरी उपक्षेत्रात - वाघाच्या शिकारीची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी वाघाला करंट लावून ठार करीत त्याला शेतशिवारात दफन केले.
आरोपी जवळून वाघाच्या 11 मिश्या आढळून आल्या आहे, आरोपी मध्ये मारोती गेडाम, रामदास शेरकी, हिराचंद भोयर व पांडुरंग गेडाम यांचा समावेश आहे.आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.