संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान शिबिर संपन्न.:#rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे रक्तदान शिबिर संपन्न.:#rajura

Share This

 

संपावर असूनही रक्तदानकरून जपले सामाजिक भान.

खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा :


जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्था राजुरा व एस.टी. संपकरी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन एस.टी. बस स्थानक राजुरा येथे करण्यात आले होते. संपावर असतानाही रक्तदान करून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण करण्याचा निर्णय घेऊन या शिबिरात चालक , वाहक, यांत्रिक अधिकारी, कर्मचारी आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी रक्तदान करून पार पाडली. कमी वेतनामुळे एस.टी. कर्मचारी यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे नेहमीच त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण कित्येक वेळा एस.टी. कर्मचाऱ्यांनी सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम करून त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन घडविले आहे.


संपावर असूनही कामगारांनी जीवनातील अतिशय महत्वाचे माणल्या जाणाऱ्या रक्तदान करून पुढाकार घेतला आहे. या रक्तदात्याची राजुरा शहरात प्रशंशा केली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्यस्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. राजुरा आगारातील या संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज पर्यंत परिश्रम करून एस.टी. महामंडळाला सांभाळणार्‍या या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शरीरातील रक्तदान करून एक वेगळा संदेश दिला आहे. आता तरी प्रशासन यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Pages