खबरकट्टा :चंद्रपूर :
दिनांक 01/11/2021 रोजी फिर्यादी नामे दयानंद नागनाथराव उपासे, वय 37 वर्षे रा. राा पोलीस लाईन क्वॉटर, तुकुम यांनी पोस्टे ला येवुन तकार दिली की फिर्यादी हे दिनांक 01/11/2021 रोजी अंदाजे 12/15 वा किरकोळ रजेवर कुटुंबासह आपले मुळ गावी वाढवणा बु ता उदगिर जि लातुर येथे जाण्या करिता आंध्रा बस ने बंगाली कॅम्प चंद्रपुर येथेन । बस मध्ये बसुन आदिलाबाद कडे जात होतो. तेव्हा फिर्यादीची पत्नी सौ आशा हि साईड सिटवर बसली व तिच्या बाजुला एक बाई लहान बाळ घेवुन बसली होती. पत्नी जवळील लेडीज पर्स होता व त्यामध्ये एका डब्यात पत्नीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. चंद्रपुर वरून बल्लारशा येथे पोहचे पर्यन्त डब्बा पत्नीचे पर्स मध्येच होता, पत्नीचे शेजारी बसलेली बाई बल्लारशा बस स्थानक समोर आपल्या बाळासह पत्नीला धक्का देत उतरली तिचे सोबत पाच ते सहा महिला उतरल्या व ते सर्व निघुन गेले. त्यानंतर बस सुरू झाली व पुढे निघाली पत्नी फोनवर बामणी टि पाईन्ट पर्यत बोलुन आपला मोबाईल पर्स मध्ये ठेवतांना पत्नीचे लक्षात आले की, दागिने ठेवलेला डब्बा पर्स मध्ये दिसले नाही. त्यामध्ये पर्स मधिल प्लॉस्टीक डब्यात 1) सोन्याचा हार वजन 40 ग्राम किं 1,20,000/ रू 2) सोन्याचा छोटा हार मिनी गठन वजन 18 ग्राम किं 54000/- रू 3) सोन्याचे नेकलेस वजन 11 ग्राम किं 33,000/-रू 4) सोन्याचे लॉकेट त्यात गणपतीचे पेडाल असलेले वजन 09 ग्राम कि 27000/-रु. 5) काळया मण्याची पोत ज्यात 80 नग सोन्याचे मणी एकुण वजन 86 ग्राम असा एकुण सोन्याचे दागिने किं 2,58,000/- रू चा मुद्देमाल शेजारी बसलेली बाई अंदाजे वय 40 ते 45 वर्षे वयोगटातील पाढऱ्या रंगाचा स्कार्प बांधलेली काळ्या सावळ्या वर्णाची मजबुत बांध्याची बसलेल्या बाईनेच पत्नीचे लेडील पर्स मध्ये असलेला डब्बा दागिन्यासह चोरून नेलाचा फिर्याद दिल्याने पोस्टे अपराध क्रमांक 1125/21 कलम 379, 34 भा द वी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले.
लागलीच पो.नि. उमेश पाटील सा. यांचे मार्गदशनात एक टिम तयार करून आरोपी शोधार्थ रवाना करण्यात आले संशयित आरोपी बाईचा शोध घेतले परंतु मिळुन आले नाही. डि बी पथकाचे प्रभारी सपोनि रमिझ मुलाणी व त्यांचे टिमने आरोपीचा तांत्रिक पध्दतीने व कशोशिने शोध घेतला असता दिनांक 06/11/2021 रोजी जनता कॉलेज परिसरात दररोज येत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सापळा लावुन सापळा रचला असता टोली प्रमुख एकुण 07 महिलांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना पोस्टे ला आणुन तांत्रिक पध्दतीने व कौशल्यपुर्णक प्रयत्न केले असता नमुद बाईयाचा गुन्हयात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निषन्न झाल्याने दिनांक 07/11/2021 रोजी गुन्हयात अटक करून त्यांचा पी सी आर घेण्यात आले. पी. सी. आर. दरम्यान मा वरिष्ठांचे आदेशान्वये तपास केला असता नमुद आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केले असता अंजनी, नागपुर पोस्टे अंतर्गतील रामेश्वरी टोली येथुन त्यांचे राहते घरातुन चोरी गेलेला सर्व मुद्देमाल सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अखिद साळवे सा, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा. यांचे मार्गदशनात उपविभागिय पोलीस अधिकारी, राजुरा मा राजा पवार सा. यांचे नेतृत्वात पोलीस निरिक्षक श्री उमेश पाटील सा, डि बी पथकाचे प्रभारी सपोनि रमिझ मुलाणी सा, नापोकों यशवंत कुमरे, नापोको संतोष दंडेवार, पोकों श्रिनिवास याभिटकर, पोको चंद्रशेखर माथनकर, पोशि दिलीप आई, मनापोशि सध्या आमटे, मपोशि सिमा पोरते पोस्टे बल्लारशा यांनी केली