सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या हस्ते ब्लँकेट व मिठाई वितरण
खबरकट्टा /चंद्रपूर :भद्रावती :
तालुक्यातील कचराळा येथे पुर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा वाढदिवसानिमित्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते गरजू व जेष्ठ नागरिकांना ब्लँकेट व मिठाई वितरण करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर सत्कार मुर्ती पुर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर , सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष कचराळा ग्रा.पं. च्या सरपंच भाग्यश्री येरगुडे, जि.प. सदस्य यशवंत वाघ, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, उपसरपंच छत्रपती एकरे, गावातील जेष्ठ नागरिक नानाजी बोबडे, सदाशिव पिंपळशेंडे, मधुकर येरगुडे, श्रीहरी आवारी, वारलू पा. आवारी, घोडपेठचे उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.पं. सदस्य तथा गटनेता ईश्वर निखाडे, ग्रा.पं. सदस्य विनोद मडावी, ज्योती मोरे, रुपाली बावणे व कांता बोबडे,माजी उपसरपंच विनोद घुगल व केशव लांजेकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम बॅंड बाजाने मान्यवरांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. यावेळी सुहासिनिंच्या शुभहस्ते सर्वमान्यवर मंडळींना पंचआरतीने ओवाळणी घालण्यात येऊन अक्षता कुंमकुम लावण्यात आले. कचराळा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवर मंडळींनी पुष्पमाला अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोडपेठच्या शिवमंदिर देवस्थानच्या वतीने गरीब व गरजू परीवाराला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते ब्लँकेट व मिठाईचे वितरण करण्यात आले. तसेच कचराळा ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ नागरिक तथा माजी पोलीस पाटील मधुकर येरगुडे यांच्या शुभहस्ते पुर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी सत्कार मुर्ती हंसराज अहीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना म्हटले की, हंसराज भैय्या नेहमी जातीपातींच्या पलिकडे जावून समाजकारण व राजकारण करीत आले. राजकारण करीत असतांना त्यांनी समाजाला कधीही चुकीच्या दिशेने नेले नाही. समाजाला घातक ठरेल अश्या प्रवृत्तीला सहकार्य केले नाही. सरकारमध्ये मंत्री असतांना सुध्दा त्यांनी कधीही पदाचा अभिमान बाळगला नाही. यामुळेच त्यांनी राजकारणाला आदर्शवत ठेवले. समाजकारण व जनसेवेत अग्रस्थानी राहीले. सर्वांसाठी खऱ्या अर्थाने हंसराज भैय्या आजही लोकनेते म्हणून आदर्शच आहेत. असे प्रदिपादन रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन घोडपेठचे उपसरपंच प्रदिप देवगडे तर आभार प्रदर्शन केशव लांजेकर यांनी केले.
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे महत कार्य जिल्ह्यात व विशेषत: वरोरा-भद्रावती तालुक्यात करण्यात येत आहे. निशुल्क कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना काळातील रुग्ण सेवा ही खरी मानवसेवा होती. निराधार बालकांच्या शिक्षणाचा खर्च, दुर्धर आजार जळलेल्यांना आर्थीक सहकार्य, आत्महत्याग्रस्त व कोरोनाने मृत झालेल्या कूटुंबातील तथा गरीब-गरजु शेतकरी, शेतमजुर पालकांच्या मुलामुलींच्या लग्नाचा खर्च हे व्रत घेतलेल्या ट्रस्टचे कार्य या क्षेत्रात जनसेवेची एक क्रांती घेवुन येईल. स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी केले.