स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी वाहन चोरी करणारी बंन्टी बबली टोळी उघडकीस आणून त्यांचेकडून एकूण 11 दुचाकी मोपेड गाडया हस्तगत केल्या.:#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी वाहन चोरी करणारी बंन्टी बबली टोळी उघडकीस आणून त्यांचेकडून एकूण 11 दुचाकी मोपेड गाडया हस्तगत केल्या.:#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर:


चंद्रपूर शहरातून बरेच दिवसापासून दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा.पोलीस अधीक्षक श्री.अरविंद साळवे साहेब, गा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, चंद्रपूर यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासबंधाने स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाना सुचना देवून दुचाकी वाहन चोरीस आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्या सबंधी मार्गदर्शीत केले. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहर परिसरात एक ईसम काळ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड दुचाकी घेवून विक्री करीता ग्राहक शोधीत असल्या बाबत गोपीनिय माहिती मिळाल्याने त्या दुचाकी चोरास साफळा रचून ताब्यात घेवून त्याचे जवळील दुचाकीची तपासणी केली असता सदरची गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने व त्याचे साथीदारांनी यापूर्वी एकूण 11 दुचाकी गोपेड गाडया चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरी करण्याची पद्धती बाबत त्यास विचारणा केली असता ते गाडी ठेवणाऱ्या इसमावर लक्ष ठेवत असत व तो दुचाकी धारक आपली गाडी ठेवून जात असतांना त्यावर लक्ष ठेवून आरोपी व त्याची मैत्रीण ती दुचाकी गाडी धक्का मारून थोडे दुरू घेवून जावून चोरीचे गाडीवर त्याची मैत्रीण स्वतः बसत असत व तीचा सहकारी आरोपी हा त्याचे गाडीने त्या चोरीचे गाडीला धक्का मारून (टोईंग करून) ती गाडी ते ठरलेल्या ठिकाणी घेवून जावून ठेवत असत व त्यांचा तिसरा साथीदार हा सदरच्या चोरीच्या गाड्याचे नंबर प्लेट बदलवून व गाडयांच्या डुप्लीकेट चाव्या तयार करून त्या विकण्या करीता ग्राहक शोधत होते.

सदर गुन्हयात आरोपीतांकडून पो.स्टे. रामनगर येथील एकूण 5 गाडया, पो.स्टे. चंद्रपूर शहर येथील 3 गाडया, पो.स्टे. बल्लारशा येथील 1 गाडी तसेच ईतर 2 दुचाकी वाहन अशा एकूण 11 दुचाकी मोपेड गाडया अंदाजे किंमत एकूण 6,30,000/- रू.चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, चंद्रपूर याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सपोनी जितेन्द्र बोबडे, पो.उप नि. सचिन गदादे, पो.हवा. संजय आतकुलवार, पो.कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकूलवार कुंदन बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो. शि. अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे. सदरची बातमी आपल्या चॅनल तथा वृत्तपत्रामध्ये प्रकाशीत करण्यास सादर आहे.

Pages