नाटक हे मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. :- गजानन पाटील जुमनाके:gajanan -jumnake - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नाटक हे मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. :- गजानन पाटील जुमनाके:gajanan -jumnake

Share This

 

खबरकट्टा /चंद्रपूर :गोंडपिपरी :-


नाटक हे मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. नाटकातून जीवनाचे दर्शन होते. सांसारिक जीवनातील प्रत्यक्ष चित्र रंगविणारी कथा म्हणजे नाटक आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नाटक प्रयोग आहे. गाव खेड्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाटकाचे आयोजन केले जाते. व मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन केले जाते. यानिमित्ताने गाठीभेटी होतात. गावाच्या विकासात्मक बाबींवर चर्चा सुध्दा केली जाते यामुळे समाजात सामाजिक ऐक्य निर्माण होवून शांतता व सुव्यवस्था निर्माण होते. नाटकातून चांगल्या व वाईट गोष्टी पहायला मिळते चांगल्या स्वीकारून वाईट गोष्टी सोडल्या जावे हे नाटक समाजाला दिशा देते परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोणा विषाणु मुळे नाटकाला वाईट दिवस आले होते. ते आता हळूहळू कमी होत आहे. चांगले दिवश यावेत आपणांस दिवाळी भाऊबीज व येणाऱ्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !. या नाटकाच्या प्रयोगाचा चांगला रसिक म्हणून आस्वाद घ्यावे आणि आवश्यक गोष्टींचे अनुकरण करावे. असे मौलिक मार्गदर्शन यावेळी गजानन पाटील जुमनाके यांनी केले. सिर्सी येथिल संगीत ह्रदय जळते" या नाटकाचे प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.


या प्रसंगी अब्दुल जमीर भाई गोंडवाना गणतंत्र पार्टी महासचिव महाराष्ट्र प्रदेश, बापुराव मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर गोंगपा व सुरेश माडुरवार शिवसेना तालुका अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रंगमंचावर बरेच पाहुणे उपस्थित होते.आणि जवळजवळ १००० प्रेक्षक रसिक म्हणून उपस्थित होते.

या नाटकाचे आयोजन सिर्सी येथिल आदिवासी समाजबांधवानी क्रांतीसुर्य बिरसामुंडा जयंती निमित्ताने केले होते.आयोजनासाठी योगेश कोरवते व त्यांचे मित्र परिवार यांनी परिश्रम घेवून प्रयोग यशस्वी पार पाडला.

Pages