खबरकट्टा /चंद्रपूर :
8 नोव्हेम्बरच्या पहाटे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनिय माहिती मिळाली की बल्लारपूर मार्गाच्या बाजूला असलेल्या बाबा नगर एका घरात काही लोक 52 पत्त्यांचा खेळ पैसे लावून खेळत आहे.
माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक IPS कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुसह त्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी 12 पत्ते बहाद्दरांसह 1 विधिसंघर्ष बालक सहित 1 लाख 97 हजार 250 रुपये रोख, 11 मोबाईल, 3 चारचाकी वाहन व 3 दुचाकी वाहन असा एकूण 36 लाख 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये काही चंद्रपूर जिल्ह्यातील कोंबडा बाजार व जुगारक्लब चालक यांचा समावेश आहे.