खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्यावतीने राज्यभरातील बॉक्सिंग खेळाडू, मार्गदर्शक व बॉक्सिंग प्रेमी करिता नववी राज्यस्तरीय बॉक्सिंग पंच कार्यशाळा व परीक्षा भद्रावती येथे दिनांक 30 व 31 ऑक्टोंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची उपाध्यक्ष श्री भरत कुमार वावळ सर, डॉक्टर प्रेमचंद सर, नागपूर विभागीय आर जे सेक्रेटरी श्री सुदेश शेंडे सर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे व परीक्षेचे आयोजन फेरीलँड स्कूल भद्रावती येथे राज्य संघटना सचिव श्री डॉक्टर राकेश तिवारी यांच्या मार्गदर्शनात केल्या गेले 25 हुन जास्त सहभागी परीक्षार्थी पैकी स्टार टू परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची कुमारी पूर्वा गणेशराव खेरकर ही अव्वल राहिली असून, स्टार वन परीक्षेमध्ये अमर भंडारवार अव्वल राहिलेला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यातून परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला असून यशस्वीरित्या रेफ्री व जज परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सदर कार्यशाळेच्या आयोजनात श्री धानोरकर साहेब अध्यक्ष फेरिलॅन्ड स्कूल भद्रावती, प्राध्यापक संगीता बांबोळे मॅडम विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी परीक्षार्थींना चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेतर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.