स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
खबरकट्टा /चंद्रपूर :भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील निराधार असलेल्या सौदर्या लांडे, सिमरण लांडे , भार्गवी सोनटक्के व गौरव सोनटक्के या विद्यार्थांना आज दि. ३१ आँक्टोंबर रोजी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य व आर्थीक मदत देण्यात आली.
घोडपेठ येथील किरण देवराव लांडे यांचे पती देवराव लांडे यांचे कोरोना संक्रमण कालावधीत द्ददयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुली आहे. थोरली मुलगी सौदर्या देवराव लांडे ही चंद्रपूरच्या जनता कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. धाकटी मुलग सिमरण देवराव लांडे ही इयत्ता ८ वी ( सेमी इंग्लीश ) मध्ये कर्मवीर विद्यालय घोडपेठ येथे शिकत आहे. मुलींची आई किरण लांडे यांची आर्थीक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांच्या पुढे मुलींच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. कवडाबाई सोनटक्के यांची नात भार्गवी व नातू गौरव यांना आई वडील नाही. आईवडीलांच्या निधनाने दोघेही भावंड पोरकी झाली आहे. आजी कवडाबाई ह्या दोघांचेही पालन पोषण करतात. कवडाबाईंची आर्थीक स्थिती सुध्दा बेताचीच आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे नातवडांच्या शिक्षणाची समस्या उभी आहे.नात भार्गवी अश्वजीत सोनटक्के इयत्ता ६ वी कर्मवीर विद्यालय घोडपेठ मध्ये शिक्षण घेत आहे. कवडाबाईचा नातू गौरव अश्वजीत सोनटक्के हा इयत्ता ४ थी जि.प. प्राथ. शाळा घोडपेठ येथे शिक्षण घेत आहे. किरण लांडे आणि कवडाबाई सोनटक्के यांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे धावून आले.
सौदर्या लांडे, सिमरण लांडे, भार्गवी सोनटक्के आणि गौरव सोनटक्के या निराधार मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांना शैक्षणिक कार्यात मदत व्हावी. या सामाजिक बांधिलकीतून स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टने या चारही विद्यार्थांना शालेय गणवेष, पुस्तके, नोटबुक, स्कुल बॅग व त्यांचा शैक्षणिक खर्च देऊन त्यांना मदत केली. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे, सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप देवगडे, ग्रा.पं. गटनेता तथा सदस्य ईश्वर निखाडे, ग्रा.पं. सदस्य ज्योती मोरे , विनोद मडावी, रुपाली बावणे, कांता बोबडे, माजी उपसरपंच विनोद घुगल, केशव लांजेकर, सखाराम पाल, अशोक शिंदे, भाऊराव वनकर, देवराव पारेकर, दशरथ मोरे व राजू बोढे प्रामुख्याने हजर होते.