- स्टॉक रेतीच्या नावाखाली घाटातून रेतीचा उपसा....
खबरकट्टा /चंद्रपूर :ब्रम्हपुरी
तालुक्यातील ५ ते ६ रेती घाटापैकी रनमोचान, अऱ्हेरनवरगांव येथील रेती घाटावरून गुलाबी थंडीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात अवैध्य रेतीची वाहतूक केली जात आहे.मात्र महसूल प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर दोनच गावातील रेती घाटावरून रेतीची अवैध तस्करी व डंपिंग होत असल्याने याला आशीर्वाद कुणाचा? असा प्रश्र्न निर्माण होऊन दररोज रात्रीच्या व पहाटीच्या सुमारास होणारी अवैध्य रेती वाहतूकीवर कारवाई होत नसल्याने महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगांव, सोंदरि, रनमोचन, आवळगाव, हळदा, बोडधा आदी गावातून वैनगंगा नदी वाहते नदी पात्र रुंद असल्यामुळे या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा उपलब्ध आहे.त्यामुळे सदर गावाला रेती घाट संबोधल्या जाते.तालुक्यातील नदी पात्रातील रेतीची जिल्हा बाहेर मोठी मागणी तसेच रेतीला वाजवी पेक्षा जास्त दर असल्याने तालुक्यातील रेती घाटावर अवैध्य रेती उत्खनन करून अवैध रेतीची वाहतूक करणारी मंडळी सक्रिय झाली.
मागील दोन तीन वर्षा पासून कोणत्याही घाटाचा शासकीय नियमाप्रमाणे लिलाव झाले नसतानाही राजकीय वराहद्दस्त व प्रशासनाचा आशीर्वाद याच्या जोरावर अवैध रेती उत्खनन करून ट्रक,ट्रॅक्टर,या साधनाने रेतीची अवैध वाहतूक केली जात होती.मात्र मागील दोन महिन्यापासून सोंदरि,आवळगाव, हळदा, बोडधा रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन व वाहतूकीवर आळा बसल्याचे सांगितले जाते.यात नव्याने रुजू झालेल्या महसूल अधिकार्यांचा वचक व त्यांच्या कारवाईने आळा बसल्याचे बोलले जाते .मात्र स्टॉक रेतीच्या नावाखाली रनमोचन,अऱ्हेरनवरगांव या रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मागील काही दिवसा आधी अऱ्हेरनवरगांव घाटावरील शासनाच्या MSMC व खाजगी रेती साठा वेगवेगळा करा. ही मागणी करण्यात आली या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही त्याचा फायदा घेत रनमोचन,अऱ्हेरनवरगांव रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन करून रात्रीच्या अंधारात व गुलाबी थंडीत ट्रक ने अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे.अऱ्हेरनवरगांव रणमोचन नदी पात्रातील रेती मागील काही दिवसा पासून मोठ्या प्रमाणात पोकल्यांड,जेसीपी च्या साहाय्याने रात्रीच्या सुमारास अवैध रित्या उत्खनन करून राजरोसपणे तब्बल ट्रॅक्टरच्या साहाय्याने व हायवा ट्रकने अवैध रेतीची तस्करी केली जात आहे मात्र प्रशासनाच्या माल सुतावू धोरणामुळे कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे या घाटाचा कर्ता करविता कोण? या घाटाला पाठबळ कुणाचे? महसूल प्रशासन का कारवाई करीत नाही.ज्या प्रमाणे बाकी घाटावरील अवैध रेती उत्खनन व वाहतूकीवर आळा बसला असल्याचे सध्या चित्र दिसत आहे मग रनमोचान,अऱ्हेरनवरगांव घाटावर रेती उत्खनन व वाहतूक होतीच कशी यावर प्रशासन का कारवाई करीत नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.