जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न
खबरकट्टा /चंद्रपुर :
नुकतेच कंगणा राणावत व विक्रम गोखले यांनी केलेले वक्तव्य हे स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणारे आहे. असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाची चुकिची मानसिकता दर्शविते. या विधानाचे चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीत जनता पक्षाच्या एकाही नेत्याकडून अद्याप खंडण करण्यात आले नाही. हा जिल्ह्यातील १९४२ च्या चिमूर क्रांती लढ्याचाही अपमान आहे, असे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी येथे आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत मांडले.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दोन दिवसीय चंद्रपुर जिल्हा दौरा पार पडला. या दरम्यान स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची जिल्हा आढावा बैठक (दि.१९) ला पार पडली. यावेळी सर्वप्रथम जेष्ठ नेते शरद पवार यांची पत्रपरीषद पार पडली. व त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांसह आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी मा. प्रफुल पटेल, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निरीक्षक प्रविण कुंटे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, चंद्रपुर जिल्हा निरिक्षक प्रविण कुंटे, सुनिल फुंडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुध्दे, वसंतराव भुईखेडकर, ख्वाजा बेग, डॉ. भालचंद्र चोपणे, डॉ. लोढा, जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, महानगर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, रायुकांचे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर, उल्हास करपे, वर्षा निकम, जया देशमुख, आदी उपस्थित होते.