निवेदन सादर :- भा ज पा व्यापारी आघाडीची खड्डे बुजविण्याची मागणी...
खबरकट्टा /यवतमाळ :वणी
वणीतील मुख्य समजल्या जाणाऱ्या गांधी चौकातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून नेमका हा रस्ता आहे की खड्डा? हेच समजणे अवघड बनले आहे कारण याठिकाणी मोठं मोठ्या खड्यानी जन्म घातल्याने, जायचे तरी कुठून हाच नेमका विचार येत आहे, या बाबींचा विचार करीत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी वणी शहराकडून वणी बाजारपेठेतील तुटी कमान ते मोठी कमान व परिसरातील खड्डे समोर येणारे सणासुदीचे दिवस व चौकातील वर्दळ लक्षात घेता त्वरित बुजवावे अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
गांधी चौक ही वणीतील मुख्य बजारपेठ आहे, या बाजारातील तुटी कमान ते मोठी कमान पर्यंतचा रोड अतिशय खराब झालेला असून मोठमोठ्या खड्यानी व्यापला आहे. या मार्गवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविणे कठीण झाले आहे. तसेच समोर येणारे सर्व सण नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी निमित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच नवरात्रीमध्ये सर्व देवींच्या विसर्जनासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तरी यामुळे कधीही कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावली आहे, तरी कोणती अनुचित घटना घडण्याआधी रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी व सर्व खड्डे बुजवावे अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी वणी शहर अध्यक्ष लवलेश लाल, सदस्य, पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांना दिले आहे.वृत्त लिहीपर्यंत कोणतीही खड्डेबुजविण्याची कार्यवाही झाली नाही.