सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल वृत्तीमुळे मुंगोली ग्रामस्थांना मनस्ताप - 'मिठाई'साठी कार्यवाहीत दिरंगाई #wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल वृत्तीमुळे मुंगोली ग्रामस्थांना मनस्ताप - 'मिठाई'साठी कार्यवाहीत दिरंगाई #wani

Share This
खबरकट्टा / वणी :

तालुक्यातील मुंगोली गावाचे पुनर्वसन स्थळ निश्चित झाले, परंतु सध्या गाव असलेल्या जागेचे २०१७ पासून दोनदा मोजमाप व मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चमूकडून करण्यात आले पण तत्सबंधीचा अहवाल मात्र अजूनही वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड (वेकोलि) प्रशासनाकडे सोपवण्यात आलेला नाही. ज्यामुळे पुढची कार्यवाही ठप्प झाली आहे. ही व्यथा आहे वणी तालुक्यातील खाणग्रस्त मुंगोली या गावातील ग्रामस्थांची.

मुंगोली डीप निर्गुडा खाण प्रकल्पाने घेरलेले मुंगोली गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा म्हणजे गावाच्या जमिनीचा मूल्यांकन अहवाल. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहेबी थाटामुळे व दफ्तरदिरंगाईमुळे सदर अहवाल आजतागायत वेकोलिकडे सोपवण्यातच आला नाही. या संपूर्ण प्रकरणात उघडउघड भ्रष्ट्राचाराचा गंध येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते (अधिकारी) मूल्यांकन अहवाल सादर करण्यासाठी 'मिठाईची' मागणी करत असल्याचे गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या पदधिकांरीनी ऑफ द रेकॉर्ड सांगितले. एकंदर त्यांची ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे अधिकारी अहवालाची कार्यवाही पुढे सरकवायला धजत नाहीत असेच स्पष्ट होते.

यासंदर्भात मुंगोली ग्रामपंचायतीचे माज़ी सरपंच तथा ऊपसरपंच ॲड.रूपेश ठाकरे यांच्याद्वारे ज़िल्हाधिकारी यवतमाळ, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), उपविभागीय अधिकारी, वणी, कार्यकारी अभियंता पांढरकवड़ा ,सार्वजनिक बांधकाम ऊपविभाग वणी व संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार भेंटी घेंऊन ,निवेदने देऊन व पत्रव्यवहार करून देखील अहवालाच्या हालचालीची प्रगती 'जैसे थे' आहे. गेल्या ०८/०९/२०२१ रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वणी यांनी नियुक्त केलेली चमू मुंगोली गावाची पाहणी करून गेली. परंतु आता या पाहणीला १ महिना व्हावयास आला तरी अद्याप अहवाल वेकोलिकडे पाठवण्यात आला नाही.



त्यामुळे आता मुंगोलीवासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला गावाचा मूल्यांकन अहवाल २७/१०/२०२१ पर्यंत वेकोलिकडे सादर करा, अन्यथा २८/१०/२०२१ पासून बेमुदत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा गावकरयामार्फ़त उपसरपंच यांनी संबधित विभागाला दिला आहे.

Pages