केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार:#sudhir mungantiwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



केमतुकुम विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार:#sudhir mungantiwar

Share This




सकारात्मक कार्यवाहीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन

खबरकट्टा /चंद्रपूर :


बल्लारपुर तालुक्यातील केमतुकुम येथील जि प प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने सात अल्पवयिन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणी पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासनाने विशेष वकीलाची नेमणुक करून फ़ास्ट ट्रैक न्यायालयात खटला चालवावा तसेच कायद्यातील तरतूदी नुसार मुलींच्या कुटुंबियाना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.


दि. 12 ऑक्टोबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले व त्यांच्याशी चर्चा केली. चंद्रपुर जिल्ह्यात महिला व मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मात्र पीड़ितांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत हो
णाऱ्या विलंबामुळे आरोपीना कायद्याचा धाक उरलेला नाही. माणुसकिला काळीमा फ़ासणाऱ्या या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. या घटनांवर आळा बसावा या दृष्टिने शासनाने गंभीर्याने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सदर प्रकरणात पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासन खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवेल व आर्थिक मदतीबाबत तरतूद तपासून योग्य कार्यवाही करेल असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

Pages