खबरकट्टा /चंद्रपूर :
गोंडपिपरी : दारूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी आम्हाला महिना 18 हजार हवा,सदर पैसे हे आम्ही ठाणेदार साहेबांना देऊ, लाच मागण्याचा नवा प्रकार गोंडपिपरी तालुक्यातील लाठी गावात घडला. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलिस अधिक्षक 18 वर्षीय मिलिंद पारडकर व पोलीस शिपाई 27 वर्षीय संजू रतनकर यांना 29 हजार 500 रुपये स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आले.
फिर्यादी यांचा शेतीचा व्यवसाय असून ते दारूबंदी असताना अवैध दारू विक्री करीत होते नंतर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यानंतर त्यांनी पुन्हा शेतीचा व्यवसायात लक्ष घालण्यास सुरू केले. त्यानंतर पोलीस शिपाई संजीव रतन कर फिर्यादीच्या घरी वारंवार जात घरझडती घेत त्यांना त्रास देऊ लागले, तू पुन्हा दारूचा व्यवसाय सुरू केला आम्हाला महिन्याचे पैसे हवे यासाठी शिपायाने तगादा लावला. दारूचा धंदा सुरू करा आम्ही कारवाई करणार नाही मात्र त्यासाठी ठानेदार साहेबांसाठी दर महिना छत्तीस हजार रुपयाची मागणी केली. पोलिसांच्या मागणीवर फिर्यादीने आधी 6 हजार 500 रुपये दिले, उर्वरित रक्कम 29 हजार पाचशे रुपये लवकर द्या असा तगादा पोलिसांनी लावला मात्र फिर्यादीला पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 11 ऑक्टोबरला पोडसा येथे उर्वरित रक्कम स्वीकारताना सपोनि पारडकर व रतनकर यांना अटक करण्यात आली.
यावरून दोन्ही आरोपी यांच्याविरुद्ध पो.स्टे. लाठी. चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला. प्र. वी नागपूर मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, मनोहर एकोणकर,पोलीस नाईक अजय बागेसर, रोशन चाटेकर, नरेश कुमार ननावरे संदेश वाघमारे,समीक्षा भोंगळे चा.ना. पो. शि.सतीश सिडाम व सर्व ला. प्र. वी चंद्रपूर यांनी केले.