राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंद सफल करण्यासाठी रस्त्यावर उतरावे ! - मा.ना.जयंत पाटील
दिल्ली,हरियाणा,उत्तरप्रदेश व संपूर्ण देशातील शेतकरी केंद्रातील "भाजप सरकारने" शेतकरी विरोधी जे कृषी कायदे केले आहे,ते "काळे कायदे" रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील ९ महिन्यांपासून थंडी उन,पावसात घरदार सोडून रस्त्यावर उतरला आहे,परंतु केंद्रातले निर्लज्ज "भाजप-मोदी" सरकार शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्या ऐवजी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांच्या वाटेत काटेरी तारेचे कुंपण, अश्रुधुर,कडकडत्या थंडीत पाण्याचा मारा, गोळीबार असे घृणास्पद प्रकार करीत आहे,आता तर शांतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भरधाव वेगाने गाड्या चढवून शेतकऱ्यांना ठार मारण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात लखीमपुर इथे घडला.
लखीमपुरच्या या निर्दयी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील 'महाआघाडी सरकारच्या' सर्व घटक पक्षांनी "केंद्र सरकारच्या" शेतकरी विरोधी व अश्या हत्याकांडाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला व त्याच अनुषंगाने येत्या सोमवारी ११ ऑक्टोंबर ला संपूर्ण "महाराष्ट्र बंद" चे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आद.ना.श्री.जयंत पाटील साहेबांच्या सूचनेवरून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला युवक सेवादल युवती विद्यार्थी उद्योग व व्यापार ओबीसी किसान सभा,अल्पसंख्यांक,सामाजीक न्याय, VJNT,वक्ता,चित्रपट नाट्य विभाग,इत्यादी सर्व विभागांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दुपट्टे घालून,या "हत्याकांडाच्या व केंद्र सरकारच्या निषेधाचे बॅनर" बनवून आपापल्या तालुक्यात/शहरात या बंद मध्ये सहभागी होवून आपल्या तालुक्यातील व्यापाऱ्यांना या बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करावे आणि ११ ऑक्टो चा बंद १००% यशस्वी करावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री.राजेंद्र वैद्य यांनी केले आहे.