खुद्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच फसवणूक :जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर येथे संचालक मंडळाचा रुपये- 2 करोड, 67 लक्ष, 83 हजार, 160 रुपयांचा जमीन खरेदी गैरव्यवहार घोटाळा #zpchandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



खुद्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचीच फसवणूक :जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर येथे संचालक मंडळाचा रुपये- 2 करोड, 67 लक्ष, 83 हजार, 160 रुपयांचा जमीन खरेदी गैरव्यवहार घोटाळा #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :




काहीच दिवसांपूर्वी जिल्हा परिषद चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करत नौकरी लावून देण्याचे बोगस प्रकरण समोर आले होते मात्र आता खुद्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाच कर्मचाऱ्यांनी गंडविल्याची बाबा समोर आली आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटी चे संचालक मंडळ, चंद्रपूर यांनी मौजा कोसारा येथे 12000 स्क्वेअर फूट (12 गुंठे) जमीन रुपये 2100/- इतक्या मोठ्या दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. सदर जमिनीची खरेदी करीता आमसभेत कोणताही ठराव पारित झालेला नसतांना सोसायटीचे संचालक मंडळ यांनी अवैध ठराव तयार करून अत्यंत गोपनीयरित्या सदर प्रकार, संचालक मंडळाचा कार्यकाल संपत असतांना, दि. 08 जून 2021 महिन्यात केल्याचे दिसून आले.

सदर प्रकरणी संचालक मंडळाने एकूण 2,67,83,160/- (दोन कोटी सदुसष्ठ लक्ष त्र्यांशी हजार एकशे साठ रुपयाचा) घोटाळा व गैरव्यवहार करत सभासदाची फसवणूक करत भ्रष्टाचार केल्याचे समजते.

सदर जागेची खरेदी मौजा कोसरा येथे सर्वे क्र. 139 भूखंड क्र. 50, 51 व 52 खरेदी केलेली असून सदर जागेचे शासकिय बाजार मूल्य केवळ रुपये 24,33,000/- चोवीस लक्ष तेहतीस हजार इतकेच आहे व सदर जागेवर सद्यस्थितीत जागेची बाजार भाव किंमत रुपये 600-700/- इतक्या प्रति चौ. फूट दरा प्रमाणे सुरू आहे. तरीही कोणताही ठराव पारित न करता परस्पर तीन पट किमतीने जागा विकत घेतल्याचे उघडकीस आले आहे.

सोसायटी करीता रामनगर येथे प्रशस्त इमारत असताना सभासदांची फसवणूक करत व अनुपस्थित सभासदाचे अनुमोदन घेत जमीन खरेदीचे ठराव मंजूर करत सदर गैरव्यवहार केल्याचे दिसून आले. गैरव्यवहाराचे मुख्य सूत्रधार श्री अजय डोर्लीकर, उमाकांत पिंपळशेंडे, अजय टेप्पलवार व सदानंद कवठे हे आहेत.




Pages