बल्लारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र कळमना मध्ये कक्ष क्र. 572 (संरक्षीत वन) मध्ये कळमना क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक गस्त करीत असतांना अवैधरित्या मुरुम खोदकाम करुन वाहतूक करतांना दिसले असता त्यांनी उत्खनन स्थळी धाव घेऊन तुळशिराम लक्ष्मण घोडाम रा. बामणी यांच्या मालकीचे स्वराज ट्रक्टर क्र. MH 34BF 9422 व ट्रॉली जप्तीची कार्यवाही करुन प्राथमिक गुन्हा क्र. 08945/223603 दिनांक 16/08/2021 नुसार ट्रक्टर मालक तसेच श्री. नागेश रविंद्र पेंदोर रा. कळमना ट्रक्टर चालक व इतर 04 मजुर यांचेवर वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह संतोष थिपे यांचे मार्गदर्शनात भगीरथ पुरी, क्षेत्र सहाय्यक कळमना, कु. एल. आर. प्रतापगीरवार वनरक्षक कळमना करीत आहेत.