ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटचे बिल हे १५ वा वित्त आयोग व स्वनिधी मधून कपात न करता शासनाने त्याकरीता स्वतंत्र निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच (संघ) असोसिएशन द्वारा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचेकडे करण्यात आली.
ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनद्वारा काल (दि.२८) ला सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे यांच्या माध्यमातून स्थानिक श्री मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. त्याअगोदर (दि.२७) पासून माहावितरण द्वारा ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईटचा विद्युत प्रवाह खंडीत करणे सुरु झाले तेव्हा याविरोधात रवि शिंदे यांनी महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. तालुक्यातील मुधोली ग्रामपंचायतीने रवि शिंदे यांच्या मार्गदर्शनात लाईनमनला नजरकैदेत ठेवून आंदोलन केले होते. याची दखल घेत महावितरणने विद्युत प्रवाह पुर्ववत केलेला होता. याच पार्श्वभुमीवर आज (दि.२९) ला ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनद्वारा रवि शिंदे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
२३ जुन २०२१ ग्रामविकास विभागाद्वारे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास मान्यता देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे, त्या निर्णयात बदल करावा.
यावेळी ग्राम संवाद सरपंच (संघ) असोसिएशनचे मार्गदर्शक देवा पाचभाई, जिल्हा अध्यक्ष रीषभ दुपारे, जिल्हा सचिव प्रशांत कोपुला, जिल्हा उपाध्यक्ष सौं.मंजुषा येरगुडे तालुका अध्यक्ष नीरज बोंडे कोची सरपंच महेंद्र भोयर मोरवा उपसरपंच भूषण पिदूरकर उसगाव सरपंच निवेदिता ठाकरे मोहरली सरपंच कातकर आदी उपस्थित होते.
