व्ही.पी.सिंग हे ओबीसींचे उध्दारक : ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे #obc - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



व्ही.पी.सिंग हे ओबीसींचे उध्दारक : ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे #obc

Share This
खबटकट्टा /चंद्रपुर :


देशात बी.पी. मंडल आयोग 7 ऑगस्ट 1990 ला लागु झाला. हा आयोग देशात लागु करणारे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग हे ओबीसींचे उध्दारक आहेत, असे उदगार ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात काढले.

आज (दि. 7) ला स्थानिक मातोश्री विद्यालय, तुकुम येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे 'मंडल दिवस' व 'राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा' स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ओबीसींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

ओबीसी समाजातील थोरमहात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. बी. पी. मंडल व सर्व महापूरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव फंड, प्रमुख वक्ता ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे, प्रा. सुर्यकांत खनके, महासचिव सचिन राजुरकर, व प्रमुख पाहूणे नरेंद्र बोबडे, नितिन कुकडे, कुणाल चहारे, विजय मालेकर, जोत्सना राजुरकर, संजय बिजवे आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे म्हणाले की मंडल दिवसाचे औचित्य साधुन याच दिवसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक मागण्यांचा पाठपुरावा केला व ब-याच मागण्या ओबीसींच्या पदरात पाडून घेता आल्या. ओबीसींच्या मागण्या घेवुन जनजागृती करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्ली, गोवा, मुंबई आदी ठीकाणी नुकतेच संमेलने घेतली आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही सामाजिक संस्था आहे. यात विविध पक्षाचे लोक आहेत. त्यामुळे एखाद्याने काही बोलले म्हणजे ती महासंघाचीच भुमिका आहे असे होत नाही. सोशल मिडीया आहे, ते सार्वजनिक व्यासपिठ आहे. त्यात कसही एडीट करुन नेटक-यांपुढे मांडता येते. त्यामुळे संभ्रम होवू शकतो. म्हणुन ओबीसींनी जागृत राहून ओबीसींसाठी राष्ट्रीय स्तरावर कोण काम करत आहे व काय मिळत आहे, याकडे बघावे. तथा राष्ट्रीय स्तरावरील संघटनेसोबत जुडून ओबीसींचा लढा बुलंद करावा, असे आवाहनही ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी केले आहे.

प्रा. सुर्यकांत खनके यांनी संविधानाच्या ३४० कलमांतर्गत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार बहाल करण्यात यावे, या मागणीला अधोरेखीत केले.

महासचिव सचिन राजुरकर यांनी ऑल इंडिया कोट्यामधे २७% यू.जी. आणी पी.जी. मधे मेडीकल प्रवेशामधे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघठनांनी आरक्षण देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. व आता जनगणना सुध्दा केंद्र सरकारने करावी या लढाईसाठी ओबीसींनी तयार रहावे, असे वक्तव्य केले.

बबनराव फंड यांनी अध्यक्षिय भाषणातून, शासन जनावरांची जनगणना करते मात्र ओबीसींची जनगणना करत नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. व ओबीसींची जनगणना व्हावी, असे मत मांडले.


यावेळी संजय बिजवे सर यांनी संचालन केले. तर जोत्सना राजुरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात संजय सपाटे, रविकांत वरारकर, रजनी मोरे, पोर्णिमा मेहरकुरे, विजया बोढे, सुरेखा वांढरे, मंजुला डुडुरे, संध्या वाढई, कल्याणी बावणे, रवि जोगी, शिरीष तपासे, सतिश पाटील, सुनिल बुटले, राकेश रहाटे, प्रेमचंद धांडे, अनंता नागपुरे, पवन पिजदुरकर, सदानंद पहानपटे, प्रदिप वैद्य, सचिन बुरसे, आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थीत होता.

Pages