Obcओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू - ना. विजय वडेट्टीवार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Obcओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू - ना. विजय वडेट्टीवार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

केंद्रातील भाजप सरकारने जाणीवपुर्वक सहकार्य न केल्यामुळेच राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणावर गदा आली असुन हे आरक्षण परत लागु करण्याकरीता केंद्र सरकारकडे असलेला ओबीसी समाजाचा डाटा मिळविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ओबीसींना मंडल आयोगामुळे मिळालेले 27 टक्के आरक्षण टिकविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा निर्धार राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेटृटीवार यांनी व्यक्त केला आहे.

महाज्योतीचे माध्यमातुन ओबीसी समाजातील युवकांना मदत केली जाणार असुन रोजगार मेळावा देखील आयोजित केला जाणार आहे. राज्यात विलासराव देशमुख यांचे सरकार असताना 2004 मध्ये ओबीसी विद्याथ्र्यांना स्काॅलरशिप सुरू झाली. पुढे काॅंग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यास ओबीसींना 100 टक्के स्काॅलरशिप देऊ असे आश्वासन ना. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात चंद्रपुर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, राजुराचे आमदार सुभाष धोटे, वरोराच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, नागपुर पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड अभिजीत वंजारी, जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रामु तिवारी, ओबीसी विभागाचे प्रदेष सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र बोबडे, ओबीसी विभाग ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, संतोष रसाळकर, भगवान कुडेकर, मंगला भुजबळ, अॅड गोविंदराव भेंडारकर, महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, प्रदेश सचिव नम्रता आचार्य, जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे आदींची उपस्थिती होती.

आ. सुभाष धोटे यांनी आपल्या भाषणातुन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत ओबीसी समाजाकरीता दुरदृष्टी ठेऊन केलेल्या तरतुदींचा उल्लेख केला.ओबीसी साठी राज्यात 19 टक्के आरक्षण असताना चंद्रपुर आणि काही जिल्हयात 11 टक्केच आरक्षण आहे. राज्यात सर्व जिल्हयात ओबीसींना सारखेच आरक्षण असले पाहीजे असेही ते म्हणाले.आ. अॅड अभिजीत वंजारी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात काॅंग्रेससह भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे चार प्रमुख पक्ष असले तरी केवळ काॅंग्रेस पक्ष हाच ओबीसी समाजाचे प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्श करत आहे.

प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी म्हणाले की, ओबीसी समाजात केंद्रातील भाजप सरकारविरूध्द खदखद असुन त्यांचे प्रश्न समजुन घेण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशानुसार राज्यभर संपर्क आणि कार्यकर्ता संवाद अभियान सुरू केले आहे. मुळात भाजपला आरक्षण संपवायचे असल्याने केंद्रातील भाजपा सरकारने कंपन्या विक्रीस काढुन खासगीकरणाचा सपाटा लावला आहे.

परंतु भाजपचा हा डाव ओबीसी समाजाने आता ओळखला असल्याने ओबीसी समाज भाजपमुक्त भारत केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 9 ऑगस्टला राज्यातील प्रत्येक जिल्हयात ओबीसी विभागाचे वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जाणार असुन ओबीसींच्या प्रश्नावरून नोव्हेंबर मध्ये दिल्लीत लाखोंच्या संख्येने धडक देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी ना. विजय वडेट्टीवार आणि भानुदास माळी यांचा शाल, श्रीफळ देऊन ओबीसी विभागाचे वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत धांडे यांनी, संचालन नरेंद्र बोबडे तर आभार प्रदर्षन नंदकिषोर वाढई यांनी केले.

Pages