महानगर पालिकेने शहरातील ६३ रुग्णालय यांचे बांधकाम इमारतींना नर्सिंग होमची मंजुरी नसल्याने महाराष्ट्र सुश्रुशागृह अधिनियम १९४९ कायद्याअंतर्गत कारवाई करावी . या आशयाची नोटीस महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविष्कार खंडारे यांनी रुग्णालय तथा नगररचना विभागाचे सहसंचालक यांना पाठवल्याने डॉक्टरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनपा ने नूतनीकरण संदर्भात सादर केलेल्या नर्सिंग होम रुग्णालयाला नर्सिंग होम नूतनीकरण करून देणे शक्य नाही . त्याला कारण महाराष्ट्र सुश्रुतागृह नोंदणी कायद्यातील कलम ५(१)(सी१) (डी)वर्ग महापालिका च्या तरतुदीनुसार ड वर्ग महापालिका टीडीआर क्रमांक 26. 1.2 व 26 .2.2 नुसार नर्सिंग होम साठी वापरण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाबाबत सादर केले सादर केलेल्या इमारतीच्या बांधकाम नकाशा हा नर्सिंग होमसाठी मंजूर नसल्याचे सदर ठिकाणी नगररचना विभागाकडून नर्सिंग होम ,रुग्णालय ,यांना नूतनीकरण करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही.
नगर रचना विभाग येथे सुधारित बांधकाम नकाशा सादर करून त्या बाबत मंजुरी घेऊन त्या संबधीच्या अर्ज व नकाशे महापालिका आरोग्य विभागाकडे ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावे असे म्हटले आहे. हा प्रस्ताव सादर न केल्यास नर्सिंग होम व रुग्णालय अनाधिकृत आहे .असे समजून कारवाई करण्यात येईल . असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी शहरातील काही डॉक्टरांची बैठक घेऊन महापालिकेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे . तर कोरोना संक्रमणात रूगांचीआर्थिक लुटीच्या ठपका असलेल्या डॉक्टरांच्या बचाव करिता या ६३ रुग्णालयांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा सुरू आहे.