काल दिनांक 23/8/2021ला ग्रामसंवाद सरपंच संघ जिल्हा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात CTPS (औषणिक वीज केंद्र )अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर औ्षणिक केंद्रात (CSTPS) अंतर्गत एकूण 52 गावे प्रकल्पबाधित आहेत. या चर्चेते प्रामुख्याने पुढील प्रमाणे विषय चर्चा करण्यात आले 1)CSR निधी अंतर्गत गावातील विविध विकास कामे करण्यात यावी 2)प्रकल्पबाधित गावातील युवकांना रोजगारात प्रथम संधी देण्यात यावी 3)CTPS कॉलनी मधील दुकानाचे गाडे या मध्ये या प्रकल्पबाधित गावातील युवकांना संधी देण्यात यावी 4) CSR निधी मधून कामे लवकरात लवकर करण्याकरिता कंपनी प्रशासनाने सहकार्य करावे 5)राखेसाठी जागा निश्चित करून कंपनी ने कुंपन करून घ्यावे जेणेकरून जंगली प्राण्याचा बंदोबस्त होण्यास मदत होणार 6)CSR निधी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतच्या सामान्य निधी मध्ये जमा करण्यात यावा.
तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच कंपनी प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिले.यावेळी ग्रामसंवाद सरपंच संघाचे जिल्हा अध्यक्ष रिषभ दुपारे,उपाध्यक्ष प्रशांत कोपूला,उपाध्यक्ष सौं मंजुषा येरगुडे,भद्रावती तालुका अध्यक्ष श्री. नयन बाबाराव जांभुळे सरपंच चंदनखेडा,बंडू पाटील ननावरे सरपंच मुधोली, भीमराव सांगोले सरपंच कटवल, मंगेश ननावरेसरपंच सावरी, प्रदीप बोढे सरपंच विसापूर,सौं संगीता खिरटकर सरपंच चोरा,गजानन जाभूळे सरपंच चिंचोली,सौं वंदना दातारकर सरपंच वडेगाव,रवी घोडमारे उपसरपंच कोंडेगाव, गीता मानोगुड्डे सरपंच विलोडा,भावना कुरेकार सरपंच वायगाव.सौं सुषमा जिवतोडे सरपंच भामडेली,भूषण पिदूरकर उपसरपंच मोरवा, राकेश गौरकार सरपंच भटाळी,प्रज्योत पुणेकर उपसरपंच दुर्गापूर, भाग्यश्री येरगुडे सरपंच कचराळा,अर्चना साव सरपंच मोरवा, सुधीरभाऊ मुडेवार सामाजिक कार्यकर्ता इत्यादी सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.