म्हणतात ना, दुस-याच्या डोळ्यातील अश्रू पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले तर त्या वेदनेची जाणीव थेट हृदयाला भिडते. असेच अनेक प्रसंग राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पनुर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बाबतीत घडताहेत. मग ती कोविड प्रादुर्भाव काळातील मदतीसाठी तत्परता असो, की राज्यात उद्भवलेल्या अनेक नैसर्गिक आपत्ती-पुरजन्य स्थिती असो की राजकीय दृष्ट्या आज सर्वात संवेदनशील ठरत असलेले ओबीसी पासून ते अनेक सामाजिक मुद्दे असो त्यांची तळमळीत कर्तव्यशीलता अनुभवयास येत आहे.
मंत्रिपदाच्या सुरुवातीच्या काळात क्षमतेपेक्षा डावलून त्यांना खाते देण्यात आले.मिळालेल्या खात्यातून फार काही प्रभाव पाडू शकणार नाही असे अनेकांनी ठरवून सुद्धा टाकले होते पण अचाट परिश्रम आणि लढाऊ वृत्ती, विरोधकांना सळो की पळो करण्याची क्षमता या स्वभाव वैशीष्ठांमुळे काँग्रेसच्या सर्वात कार्यक्षम मंत्र्यांमधे पालकमंत्री विजय वाडेट्टीवार अग्रेसर आहेत. जुन्या सैनिक लढवय्या वृत्तीनेच त्यांच्या सच्चा काँग्रेसी बाण्याचे दर्शन या कोरोना सारखी कठीण स्थतीतच दिसले त्याचसोबत ज्यावेळी राज्यात नैसर्गिक व इतर आपप्ती आल्या त्या वेळी देखील त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन सर्व महाराष्ट्राला घडले.
काही दिवसांपूर्वीच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने ज्या कुटुंबावर आभाळ कोसळले त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मंत्र्यांचाही बांध फुटला आणि त्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.
पूर, अतिवृष्टी, भुस्सखलन अशा नैसर्गिक आपत्ती आता मानवाला नवीन राहिल्या नाही. निसर्गाने आपले अर्थचक्रच बदलल्यामुळे अशा संकटाचा सामना वारंवार करावा लागतो. मात्र अशा परिस्थितीत संकटांना सामारे जाऊन नागरिकांच्या दु:खात सहभागी होणे, पिडीतांच्या पाठीशी आम्ही आहोत, असा विश्वास निर्माण करणे आणि पुन्हा उभे राहण्यासाठी शासन - प्रशासन म्हणून जे काही करणे शक्य आहे, ती सर्व मदत मिळवून देणे अतिशय महत्वाचे असते.
त्यामुळेच आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन हे दोन्ही विभाग नागरिकांच्या दु:ख निवारणाशी जोडले आहेत. त्यातच विजय वडेट्टीवार यांच्यासारखे संवेदनशील नेतृत्व या विभागाला लाभल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांमध्ये ' संकटात धावणारा आपला माणूस' अशी भावना निर्माण होते. नागरिकांच्या या भावनेला तडा न देता व निसर्ग धक्के देत असतांना निसर्गाला धक्का देऊन हे व्यक्तिमत्व थेट पूरपरिस्थितीत 'ऑन दी स्पॉट' कार्यरत असते.
मुंबईवरून रस्तामार्गे निघतांना धो-धो कोसळणारा मुसळधार पाऊस, पावसामुळे रस्ते उखडलेले, कुठे रस्त्याचे बांधकाम सुरू तर कुठे दरड कोसळलेली अशी विपरीत परिस्थिती असतांनाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये चार दिवसात 900 किमी चा प्रवास केला. सुरवातीला रायगड जिल्ह्यातील महाडची पाहणी केल्यानंतर ते खेड येथे पोहचले.
रात्रीचा मुक्काम खेड येथे केल्यानंतर दुस-या दिवशी सकाळीच रत्नागिरी जिल्ह्यातील तळे हे गाव गाठले. याच तळे गावात अतिवृष्टीमुळे 84 नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. तर रस्त्यामध्येसुध्दा दरड कोसळली होती. गावाची परिस्थिती स्मशानापेक्षा कमी नव्हती. मात्र आपला आप्तस्वकीय तेथे संकटात आहे, ही जाणीव ठेवून वडेट्टीवार त्यांच्या मदतीला धावून गेले. यानंतर चिपळूणचा दौरा त्यांनी केला. येथे तर भयानक आणि वेदनादायी परिस्थीती पाहून मंत्री श्री. वडेट्टीवारही गहिवरले.
आपबिती कथन करतांना श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले की, सर्वच ठिकाणी प्रचंड मोठे नुकसान झाले होते. कुटुंबच्या कुटुंब पूर्णपणे उध्दस्त झाली होती. पिडीतांच्या डोळ्यातील अश्रूच सर्व परिस्थिती कथन करत होते. सर्वच नि:शब्द. यातून पुढे कसे उभे राहायचे, हीच चिंता पिडीतांच्या देहबोलीवरून जाणवत होती. नागरिकांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास खडतर आहे, असेच चित्र सर्वत्र दिसत होते. सर्वांच्या नजरा शासनाकडे लागल्या होत्या.
लोकांचे दु:ख हे आपले दु:ख मानून शासन-प्रशासन कामाला लागले. राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील असून नागरिकांना उभे करण्यासाठी व पिडीतांचे अश्रू पुसण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी करून सरकारने पिडीतांसाठी 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर केली. मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी चार दिवसात 900 किमीचा प्रवास केल्यानंतर नागरिकांचे सगळे दु:ख, सगळ्या वेदना डोळ्यात साठवून भविष्यात असे संकट येऊ नये, असे साकडं देवाला घालून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. स्वत:च्या डोळ्यासमोर मृतदेह काढतांना पाहिले आणि आपलेही डोळे पाणावले, असे अनुभव चार दिवसात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाले तेव्हापासून कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. ते आजही कायम आहे. मात्र अशा संकटाचा सामना राज्य सरकार धैर्याने करत आहे. कितीही संकटे आली तरी नागरिकांप्रती जबाबदार हे सरकार आहे, याची जाणीव राज्यातील जनतेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र कधी थांबला नाही….थांबणार नाही, असाच विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या प्रेरनेतून 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत चंद्रपूरातून जीवनावश्यक साहित्य रवाना :नैसर्गिक संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा चंद्रपूर जिल्ह्याची राहिली आहे. प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य - ठेमस्कर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात आठवडाभरात पूर पिडीतांसाठी 'एक हात मदतीचा' हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून अनेकांनी या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. पूर पिडीतांचे दु:ख हे आपले दु:ख मानून आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्र्याच्या या जिल्ह्याने कपडे, भांडी, जीवनावश्यक साहित्य, धान्य, अन्नधान्य, पाणी बॉटल्स, सॅनिटायझर, औषधी, ब्लँकेट आदी वस्तु पूर पिडीतांसाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठविल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच हिरवी झेंडी दाखवून साहित्य भरलेला ट्रक रवाना केला.