सविस्तर वृत्त असे की २९/०६/२०२१ रोजी मुरली दालमिया सिमेंट कंपनी नारंडा गाव येथे संतोष चव्हाण नामक कामगाराचा सेफ्टी रोप न दिल्यामुळे उंचीवरून पडून मृत्यू झाला. हे प्रकरण खूप तापले होते. जवळपास सर्वच कामगार संघटनांनी त्या ठिकाणी आपापली पोळी शेकण्याचा प्रयत्न केला व चार ते पाच तास कंपनीचे काम बंद ठेवल्यामुळे पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन व कामगार संघटना यांच्यामध्ये अंदाजन ५ तास चर्चा झाल्यानंतर अखेरीस त्या मृत कामगाराच्या वारसांना सोळा लाख रुपये कंपनीने दिले या प्रकरणी सर्वच कथित कामगार संघटनांच्या नेत्यांनी आपली पाठ थोपटून घेतली.
परंतु अशी घटना परत होऊ नये याकरता मात्र एकमेव सुरज ठाकरे यांनी आवाज उचलला व याचा पाठपुरावा करत राज्याचे मुख्यमंत्री तथा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन या घटनेचा निषेध नोंदवित संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तथा याप्रकरणी युवा स्वाभिमान पक्षाच्या सन्माननीय खासदार नवनीत राणा यांनीदेखील हस्तक्षेप करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील पाठपुरावा केला अखेर या मागणीला यश येऊन विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रपूर व गडचिरोली यांच्याद्वारे सूरज ठाकरे यांच्या मागणीनुसार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
कुठल्याही कामगाराचा जीव पैशाने भरून देता येत नाही. सर्व कंपन्यांना कंपनी सुरू करण्याआधीच सेफ्टी बाबत सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या पाळणे त्यांना कायद्याने अनिवार्य असते असे असताना देखील उद्योगपती हे त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना किड्या-मुंग्यान सारखी वागणूक देतात. व त्यांच्या जीवाची किंमत पैशांमध्ये मोजून मोकळे होतात. हा प्रकार जय भवानी कामगार संघटना व युवा स्वाभिमान पक्ष चंद्रपुर कदापि सहन करणार नाही. कामगारांचा जीव हा पैशाने मोजण्याची पद्धत ही सर्व उद्योगपतींनी अवलंबलेली आहे. ही आता यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही.
असे खडे बोल श्री. सुरज ठाकरे यांनी यावेळी कंपनीला सुनावले व ही फक्त सुरुवात असून या अर्ज चौकशी चे रूपांतर एफ आय आर मध्ये करण्याकरिता सर्व स्तरावर प्रयत्न करेल व कंपनीला अद्दल घडवणाराच असे श्री. सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले व आज त्यांनी आपली साक्ष कोरपना पोलीस स्टेशन येथे कंपनीच्या विरोधामध्ये नोंदविली आहे.
