वणी-झरी-मारेगाव मध्ये ३ जानेवारी २०२१ मध्ये ओबीसीचा विशाल मोर्चा आयोजित करून अख्ख्या मतदार संघ दणाणून सोडला त्या ओबीसी (समाविष्ट जाती) जातनिहाय जनगणना कृतीच्या परत एकदा जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ह्या प्रमूख विषयाला घेऊन परत ऍक्शन मोड आलेली आहे. सोबतच गाव तीथे समिती गठीत करून ओबीसी समूहातील सामान्य कुटूंबला मुख्य प्रवाहात आणून त्याच्या अधिकारप्रति जागरूकता निर्माण व्हावी ह्या उद्देशाने काल बैठक घेण्यात आलेली. ही बैठक धनोजे कुणबी भवन येथे संपन्न झाली.
प्रदीपभाऊ बोनगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली ह्या बैठकीत ओबीसी च्या सर्वागिन विषयावर विवीध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले मोहन हरडे निमंत्रक विकास चिडे, प्रवीण खानझोडे, दिलीप भोयर, ऍड अमोल टोंगे, संजय खाडे, धनंजय आंबटकर, बाळकृष्ण राजूरकर, नामदेव जनेकर, शेख रहीम,पांडुरंग पंडिले, भवानी मांदाडे,नारायण मांडवकर, मोहन ठाकरे, गजानन मत्ते, राम मुडे सर अनिल टोंगे,सुरेश मांडवकर संजय गाथाडे, बाबाराव ढवस , हेमंत कलंबे,लीलाधर चौधरी,रवींद्र मिलमिले,प्रवीण लोंढे,गजानन पेचे, राजेश पहापले, संजय खडसे, मधुकर रतावर, राजेंद्र जयस्वाल, गजानन चांदावार, काशिनाथ पचकाटे, संदीप आस्वले सर्व कृती समितीचे मुख्य समव्ययक उपस्थित होते.
