राष्ट्रीय ओबीसी महासंघाची दिल्ली येथे उद्या (दि.२६) ला सभा डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, चेतन शिंदे दिल्लीकरीता रवाना #obc-mahasangh - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राष्ट्रीय ओबीसी महासंघाची दिल्ली येथे उद्या (दि.२६) ला सभा डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, चेतन शिंदे दिल्लीकरीता रवाना #obc-mahasangh

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारणीची सभा सोमवार (दि.२६) ला दुपारी २ वाजता दिल्ली येथील आंध्र भवन येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेमधे ही सभा होणार आहे. 

या सभेत २०२१ मधे राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाविषयी चर्चा, केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावे, संपूर्ण भारत देशात नीट कोटा मधे ओबीसी विद्यार्थ्यांना यु.जी. व पी.जी. मधे २७% आरक्षण लागु करण्यात यावे, ओबीसी समाजाला लावण्यात आलेल्या क्रिमिलेअरच्या मर्यादेत वाढ करणे, सरकारी कर्मचा-यांना पदोन्नतीमधे आरक्षण, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयातील ओबीसींच्या अनुशेषाबाबत चर्चा, ७ ऑगस्ट २०२१ च्या सहाव्या महाअधिवेशनावर चर्चा आदी विषयांना घेवुन या सभेत चर्चा होणार आहे. व पुढील देशव्यापी कृतीचा आराखडा ठरणार आहे.


या सभेत जस्टिस इश्वरैया, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, डॉ. खुशाल बोपचे, शेषराव येलेकर, सुभाष घाटे, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष चेतन शिंदे, शाम लेडे, शरद वानखेडे, शकील पटेल, प्रदिप वादाफळे, गुणेश्वर आरिकर, मधू नाईक, राजेश कुमार, श्रीनिवास गौड, कल्पना मानकर, सुषमा भड, रेखा बाराहाते आदी अनेक कार्यकारीणी सदस्य उपस्थित असणार आहेत. सोबतच देशभरातील ओबीसी प्रतीनीधी सभेत असणार आहेत.

Pages