विदर्भातील महत्त्वाची राजकीय घडामोड, विदर्भातील ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित - भारतीय जनता पक्षाला धक्का - राष्ट्रवादीने विदर्भातील ओबीसींचे नेतृत्व हेरले, राष्ट्रवादीची पोकळी भरुन निघेल - चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात होईल मोठा बदल#ncp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



विदर्भातील महत्त्वाची राजकीय घडामोड, विदर्भातील ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित - भारतीय जनता पक्षाला धक्का - राष्ट्रवादीने विदर्भातील ओबीसींचे नेतृत्व हेरले, राष्ट्रवादीची पोकळी भरुन निघेल - चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात होईल मोठा बदल#ncp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : रविकांत वरारकर : 

विदर्भातील राजकारणात आज एक मोठी राजकीय घडामोड झाली. विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.


या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चंद्रपूर आणि विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे प्रा. डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक असलेला एक परिचित मोहरा आपल्यात ओढून घेतल्याचे बोलले जात आहे. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षण संस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डॉ. अशोक जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक दमदार चेहरा मिळाला आहे.


पूर्व विदर्भात शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवनारे शिक्षण महर्षी स्वर्गवासी श्रीहरी जिवतोडे गुरुजी यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे वडील स्व. श्रीहरी बळीरामजी जिवतोडे गुरुजी १९६५ मधे चिचपल्ली-दुर्गापूर जि.प. क्षेत्रातून जिल्हा परीषद सदस्य होते. चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती राहीले. व १९६७ मधे राजूरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव धोटेंचा चार हजार मतांनी पराभव करीत आमदार झाले होते.


विदर्भात व संपूर्ण देशात ओबीसी चळवळ सक्रीय करुन ओबीसींना न्याय देण्याचा व त्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकार कडून मंजुर करण्यासाठी देशभरात विविध राज्यात ओबीसी समाजाचे अधिवेशने घेणे, ओबीसीच्या न्याय्य चळवळ व हक्कासाठी वेळोवेळी निर्दर्शने व आंदोलने करणारे विदर्भातील ओबीसी चळवळीचे नेते तथा विदर्भ विकासाची यशस्वी चळवळ चालविणारे डॉ. अशोक जिवतोडे आहेत. डॉ. अशोक जिवतोडे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी समाज यांच्या पाठीशी खंभीरपने उभा राहणार आहे. सोबतच राष्ट्रवादीची विदर्भातील पोकळी भरुन निघणार आहे. 


राज्यात ओबीसीचा नारा पुढे करणारे भाजप सरकार त्यांचे दोन माजी मंत्री असलेल्या चंद्रपुरातून एक कोहिनूर शरद पवारांनी राष्ट्रवादित खेचुन आनल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

शरद पवार यांनी विदर्भात ओबीसी व विदर्भ चळवळीचा, सामाजिक कार्यात अग्रेसर, सुशिक्षित असलेला चेहरा आपल्याकडे वळविल्याने आता चंद्रपुरातील राजकारण तापले आहे. या प्रवेशाला घेवून आता पासून 2024 मधील निवडणुकीचे गणित लावणे सुरु झाले आहे. त्याचे कारण म्हणजे शरद पवार यांचे राजकारण म्हटले जात आहे.

⭕️ प्राचार्य डॉ. अशोक जोवतोड़े यांचा परिचय : 


शिक्षण : एम.कॉम. एम.ए. (अर्थशात्र), एम.फील. एम.एड. पी.एचडी. (शिक्षण, वाणिज्य)

ओबीसी समाजजागृती : - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून उत्कृष्ठ कार्य. दिल्ली, हैद्राबाद, नागपुर व इतर ठिकाणी ओबीसी चे राष्ट्रीय अधिवेशन आयोजनात मोठा सहभाग. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चाचे १६ डिसेंबर २०१८ रोजी आयोजन व यात सर्व जिल्ह्यातून ओबीसी बंधूभगिनींची लाखोंच्या उपस्थिती होती. या मोर्चामुळे राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली. अनेक ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात डॉ. अशोक जीवतोडे सर्वात समोर आहेत. सोबतच विदर्भ विकासाची चळवळ यशस्वीरीत्या चालविण्याचे कार्य डॉ. अशोक जिवतोडे यांचे आहे.
------------------------------------------------------
राजकीय ब्रेकिंग : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जीवतोडे यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश 

खबरकट्टा / चंद्रपूर :थोडक्यात वृत -



राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

अशोक जीवतोडे हे विदर्भातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात त्यांनी विदर्भात ओबीसी चळवळीला मोठे रूप दिले.


बघा प्रवेश vedio 👇




मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवारांची भेट घेत जीवतोडे यांनी प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.

Pages