ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनपा मध्ये मोठे फेरबदल बघायला मिळणार आहे. यात विद्यमान स्थायी समिती सभापतींची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता असून सत्तारूढ पक्षाच्या एका गटनेता असलेल्या वरिष्ठ नगरसेवकाची वर्णी लागणार असल्याची माहिती पक्षांतर्गत गटातून येत आहे.
हेच नगरसेवक गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज असल्याने ऐन निवडणुकीच्या आधी कोणताही राजकीय घातपात टाळण्याकरिता हा निर्णय पक्षाला घ्यावा लागणार असल्याचे कळते.
चंद्रपूर मनपा स्थायी समिती मध्ये एकूण 16 सदस्य असून त्यापैकी 10 सदस्य हे सत्तारूढ भाजप पक्षाचे आहे व विरोधी गटातून 6 यापैकी काँग्रेस -3, राष्ट्रवादी -1, बसपा -2 सदस्य आहेत.यापैकी भाजप गटातील 3 सदस्य पदाची मुदत 7 एप्रिल 2021 ला संपल्याने नवीन तीन नगरसेवाकांची सदस्य म्हणून वर्णी लागण्याची संभावना आहे.
येत्या 29 जुलै ला होणाऱ्या आमसभेत हा विषय वेळेवर येऊ शकतो त्यामुळे पूर्वतयारी म्हणून भाजपच्या काही नगरसेवाकांना सहलीवर पाठविण्यात आले असल्याची चर्चा आज शहरात आहे.
📡 टीम खबरकट्टा

