आज दि. ११/०७/२०२१ दुपारी १२ :३० वा हिराई गेस्ट हाउस येथे मा.खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्या समक्ष ना. नितीन राऊत साहेब, ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ( CSTPS ) महाऔष्णिक केंद्र चंद्रपूरचे ८ व ९ नंबर ५०० मेगावॅट युनिट चे प्लांट हे महानगरपालिकेच्या हद्दीत येतो या प्लांट मुळे शहरी भागात मोठया प्रमाणात प्रदूषण होत असून शहरातील लोकांना नाहक त्रास होत आहे.
या उपाय योजना करीत ( CSTPS ) चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र कडून महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही हे निदर्शनास आणून दिले व ( CSTPS ) चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रा कडून महानगरपालिकेला स्वच्छता, रस्तेबांधकाम, नाली बांधकाम व सभागृह उभारण्याकरिता १० कोटी CSR फंड देण्याचे यावे अशी विनंती नंदू नागरकर माजी अध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी व सुनीता लोढीय अ.भा.काँ.क सदस्या, तथा नगरसेवक मनपा चंद्रपूर यांनी केली आहे.

