राजुरा शहरातील फारुख भंगारवाले यांनी गेल्या ३० वर्षांपासून बारा मीटर रुंदीचा रस्ता अनधिकृतपणे आपल्या व्यवसायिक उपयोगाकरिता अतिक्रमण करून ठेवलेला आहे. यामुळे तेथील जनतेला रहदारी करता रस्ता उपलब्ध नाही. ही गंभीर बाब जनतेच्या समक्ष सूरज ठाकरे यांनी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रस्ता संदर्भात तक्रार केली.
या रस्त्या संदर्भात दिनांक-७/०१/२०२१ ला जिल्हाधिकारी यांचा राजुरा नगर परिषदेला अतिक्रमण हटवण्याबाबत स्पष्ट आदेश होऊन देखील मुख्याधिकारी राजुरा यांनी अजून पर्यंत सदर अतिक्रमण हे का हटविले नाही.असा राजुरा वासियांना प्रश्न पडलेला आहे. राजुरा नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे नक्कीच भंगार विक्रेत्यांशी नगरपरिषदेचे आर्थिक साटेलोटे असण्याची शंका नाकारता येत नाही.
जाणीवपूर्वक राजुरा नगरपरिषद हे अतिक्रमण हटवित नसल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या आदेशाची अवहेलना होत असल्याबाबत दिनांक:- २७/०५/२०२१ जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती दिली व तात्काळ सदर अतिक्रमण हटवावे याबाबत विनंती केली असता दिनांक:-७/०६/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशाचे तात्काळ पालन करण्याचे आदेश मुख्याधिकारी राजुरा यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
राजुरा नगरपरिषदेने या रस्त्या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याकरिता १० तारखेपर्यंत चा वेळ शासनाला दिला होता. अन्यथा दाखल न घेतल्यास शासनाला प्रतिवादी करून मा उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला सुरज ठाकरे यांनी निवेदन देऊन चर्चेच्या माध्यमातून दिल्यानंतर अखेर दिनांक:- ७/०६/२०२१ ला जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेत ३० वर्षांपासूनचे अतिक्रमण हटविण्याकरिता स्पष्ट लिखित स्वरूपात पत्र देऊन अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहे.
