त्या पत्रकाराच्या " आसऱ्याचे " मनपात राजकारण...!! #mncchandrqpur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



त्या पत्रकाराच्या " आसऱ्याचे " मनपात राजकारण...!! #mncchandrqpur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आसरा कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने, मनपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विना मास्क काढलेल्या फोटो घटनेच्या गांभीर्या पेक्षा राजकारणच अधिक केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
या फोटोचे राजकारणच जास्त :

आसरा च्या निमित्तानं खरतर महापालिकेने रुग्णांसाठी एक चांगलं काम केलं. या कामाचे कौतुक समाजाने करायला पाहिजे. मात्र काही हितसंबंध दुखवलेल्यानी पदाधिकाऱ्याच्या ग्रुप फोटोवरून सोशल मीडियावर मनपाला ट्रोल करणे सुरू केले. हेतू वाईट असता तर या पदाधिकाऱ्यांनी हा फोटो बाहेर येऊच दिला नसता.

आसरा च्या निमित्ताने एकत्र गोळा झालेल्या सर्वांनी आठवण म्हणून सभागृहात हा फोटो घेतला. हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे वेगळ्या परवानगीची गरज नव्हती. शासकीय कार्यक्रमात गृप फोटो घेऊ नये असे ब्रेक द चैन नियमावलीत कुठेही नमूद नाही. तरीही काही ट्रोल बहादूराना या चुका आढळल्याने, संबंधितांनी दंड हे भरला. तरीही ज्या पद्धतीने या फोटो वरून राजकारण सुरूच आहे त्यावरून विरोधकांना कामापेक्षा काड्यात अधिक रस असल्याचे स्पष्ट होते.

मनपात आपले हितसंबंध धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतरच, एका दलाल पत्रकारा मार्फत फोटो प्रकरण सतत तेवत ठेवला जात असल्याचेही ऐकिवात आहे...

हा लेख आवडल्यास व खबरकट्टा च्या infinity17media@gmail.com या ई-मेल पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. प्रतिक्रिया नोंदविणाऱ्यांची नावे संपूर्णतः गोपनीय ठेवण्याची हमी टीम खबरकट्टा घेत आहे. आपल्या प्रतिक्रिया समजून घेतल्यानंतरच पुढील क्रमशः लेख प्रकाशित करण्यात येतील.

⭕️युधिष्ठिर महाभारतातील....! नव्हे नव्हे सेलेब्रेशन च्या पुढ कलयुगातील साई युधिष्ठिर...!!!

⭕️ बाटलीपुरते प्रमोदपुराण... गुन्हे शाखेतच जाऊन लपलाय काय खरा चोर...!!

Pages