कोरपना तालुक्यातील पिपरी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष अनिल उर्फ प्रफुल्ल मधुकर चांदेकर याने लगतच्या शऱज गावातील एका सज्ञान मुलीची ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर वायरल करून तिची नाहक बदनामी केल्याची तक्रार पोलीस ठाणे कोरपना येथे भादवि कलम 450,345(d)(1),294,506 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000च्या कलम 66अंतर्गत नोंद करण्यात आल्याचे काल वृत्त पसरताच या बहुरूपी महाशयामुळे त्रस्त असलेल्या कोरपना पंचक्रोशीत प्रचंड चर्चा आहे.
चर्चित कथनानुसार अनिल चांदेकर हा तरुण पंचक्रोशीतील गावांमध्ये अनेक लावालावींचे उपद्व्याप करत फिरत असून याच्या या उचापती स्वभावामुळे नागरिक त्रस्त व भयभीत आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी एका प्रेमप्रकरणात या उपद्व्यापी ने तरुणी मुलीला फूस लावत प्रियलरबद्दल पोलीस तक्रार करण्यास भाग पाडल्याचे लोक सांगतात तर याच डबल ढोलकी ने प्रियकराकडेही मी सर्व सांभाळून घेईल असे सांगत कोर्ट कचेरीपर्यंत दुहेरी भूमिका निभावली.
आता मात्र याच प्रकरणातील तरुणीने अनिल चांदेकर याने माझे व प्रियकराची संभाषण कॉल रेकॉर्डिंग वायरल करत माझी समाजात बदनामी केल्याची व वेळी अवेळी घरी येऊन त्रास देणे. दबावाखाली ठेवणे बाबत पोलीस ठाणे कोरपना येथे तक्रार दाखल केल्याने हा बहिरूपी आरोपी महाशय गजाआड झालाय.
स्वतः तंटामुक्ती अध्यक्ष व कथित पत्रकार असल्याचे सांगून हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बँकेचे,निराधार. पोलीस ठाणे ते तहसीलदार कार्यालयातील कामे करून देतो अशी बतावणी करत अनेकांना लुबाडण्याचा याचा सपाटा लावला असून सर्वच राजकीय पक्षाचे बिल्ले खिश्यात घेऊन फिरत माझं कोन काय करत अश्या अविर्भावात अनिल चांदेकर वावरत असल्याचे आर्थिक पिळवणूक झालेले गोर-गरीब सांगतात.
परंतु आता अनिल चांदेकर पोलीस कोठडीत असल्याने त्याच्या विक्षिप्त स्वभाव व धाकाने दबून असलेले अनेक व्यक्ती तक्रारीस पुढे येत असल्याचे आढळले.






